Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्यादिपाली सय्यद यांनी 'त्या' ट्विटवर दिले स्पष्टीकरण; म्हणाल्या...

दिपाली सय्यद यांनी ‘त्या’ ट्विटवर दिले स्पष्टीकरण; म्हणाल्या…

मुंबई । Mumbai

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी काल केलेल्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. ज्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख ((Shiv Sena chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) एकत्र येणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिले आहे…

- Advertisement -

यावेळी बोलतांना दिपाली सय्यद म्हणाल्या की, मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांसोबतही बोलले. यानंतर त्यांच्या बोलण्यातून मला जे जाणवले तेच मी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. तसेच सगळ्यांनी पुन्हा एकत्र यावे अशी इच्छा आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे असे वाटते. त्यामुळे अडथळे तोडण्याचे माझे काम सुरू आहे. मान अपमान बाजूला ठेवून प्रत्येकाने शांततेचा पवित्रा घेतला आणि एकत्र बसून बोलले तर सगळे ठीक होऊ शकते, असा विश्वाही त्यांनी व्यक्त केला.

पुढे त्या म्हणाल्या की, शिवसेनेत दोन गट पडले आहेत. हे दोन गट मला नको आहेत. पूर्णपणे शिवसेना (Shivsena) एकत्रित हवी आहे. यासाठी मी मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला आहे. मी शिवसेनेची साधी कार्यकर्ता आहे. प्रत्येक शिवसैनिकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मी माझे मत मांडल्याचे त्या म्हणाल्या. हे तुटलेले घर पुन्हा एकत्र यावे असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच माझ्यावर कारवाई करण्याचा काहीही संबंध येत नाही. कारण मी मध्यस्थीची भूमिका बजावली आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनाही (Sanjay Raut) सय्यद यांनी संयमाचा सल्ला दिला असून त्या म्हणाल्या की, राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची ती शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. त्यामागे त्यांचा हेतू फक्त शिवसेनेला पाठिंबा द्यायचा असतो. पण राऊतांनीही शांतता घ्यावी आणि त्यांनीच पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्रित आणावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या दोन दिवसात भेट होणार असल्याचा दावाही सय्यद यांनी पत्रकार परिषदेत केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या