Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमहापुरुषांकडून देशाला दिशा : पालकमंत्री भुसे

महापुरुषांकडून देशाला दिशा : पालकमंत्री भुसे

श्री छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले स्मारकाचे लोकार्पण

- Advertisement -

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला दिशा व विचार देणार्‍या छत्रपती शिवराय, घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व संग्रहालयाचे आज लोकार्पण होत आहे.या महापुरुषांच्या ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे.एकाच दिवशी या स्मारकांचे होत असलेले लोकार्पण शहराचा इतिहास लिहिताना आजचा दिन निश्चितपणे सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे बोलताना केले.

मोसम पुलावरील क्रांतीज्योतीबाई फुले संग्रहालय व ग्रंथालय तसेच शिवतीर्थावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक सुशोभीकरण व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकांचे पालकमंत्री दादा भुसे यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी शिवतीर्थावरील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, मनपा आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे, उपायुक्त गणेश शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम, माजी उपमहापौर निलेश आहेर, मनोहर बच्छाव, संजय दुसाने, विनोद वाघ, रिपाई जिल्हाध्यक्ष भारत जगताप, दीपक निकम, कैलास तिसगे, प्रमोद शुक्ला ,सुरेश शिवदे, भारत चव्हाण, भीमा भडांगे, जितेंद्र पाटील ,भारत मसदे, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष संजय महाले, प्रमोद निकम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर इंगळे, दादाजी महाले, सतीश पवार, प्रमोद पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, लकी गिल, हरिप्रसाद गुप्ता, मधुकर देवरे ,राजेश गंगावणे, दीपक पाटील, अ‍ॅड. आर के बच्छाव, नंदू तात्या सोयगावकर, भरत पाटील, नितीन पोपळे, सुनील चांगरे ,जगदीश खैरनार, योगेश पाटील, आदि सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मोसम पुलावरील सावित्रीबाई फुले संग्रहालय व अभ्यासिकेचा लाभ महिला व विद्यार्थिनींना घेता येणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या ग्रंथालयात फुले दाम्पत्यांनी केलेला संघर्ष चित्राद्वारे रेखाटण्यात आला आहे.हे संग्रहालय सामाजिक समता वृद्धिंगत करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले बालपणापासून संघर्ष करीत 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेत स्वराज्य उभा करणार्‍या छत्रपतींच्या स्मारकांची सुशोभीकरण शिवभक्तांना निश्चित प्रेरणा देणारे ठरणार आहे.

शिवस्मारक सुशोभीकरणासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलने केली.तीन वेळा निविदा निघून प्रतिसाद कमी मिळाला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देताच मनपाने दीड कोटीची तरतूद केली.आजच्या मुहूर्तावर हे लोकार्पण होत असले तरी उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल .भर पावसात सुशोभीकरणाचे काम करणार्‍या कामगाराचे परिश्रम देखील कौतुकास्पद असल्याचे भुसे यांनी पुढे बोलताना सांगितले.गत दोन दशकापासून प्रलंबित असलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे देखील आज लोकार्पण होत आहे.या स्मारकासाठी देखील अनेकांनी संघर्ष केला. विविध अडचणी उभ्या राहिल्या मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष देताच प्रशासन यंत्रणेने जलद गतीने कार्यवाही करत परवानगीसह जागा उपलब्ध करून दिल्याने आज हे स्मारक साकारले आहे.तीन महापुरुषांच्या स्मारकांचे लोकार्पण सोहळा जणू शहरात दिवाळीच साजरी होत आहे.जनतेच्या मागण्याची पूर्तता करता आल्याचे समाधान आपणास लाभले आहे.

या सोहळ्या स सर्वपक्षीय नेते पदाधिकार्‍यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शविलेली उपस्थिती खर्‍या अर्थाने मालेगावकरांच्या तीन पिढ्यांचे पूर्ण होत असलेले स्वप्नांचा आनंद दर्शवणारी असल्याचे सांगितले .स्मारक सुशोभीकरणानिमित्त शिवतीर्थ, मोसम पूल व राष्ट्रीय एकात्मता चौक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती .तसेच नेत्र दीपक फटाक्यांच्या आतषबाजीने हा लोकार्पण सोहळा पार पडला खासदार शिंदे तर्फे अभिवादन शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी रात्री मालेगाव भेट देत सुशोभीकरण करण्यात आलेल्या शिवस्मारकासह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संग्रहालय व अभ्यासिका तसेच घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकास भेट देत अभिवादन केले शहरात निर्माण करण्यात आलेले महापुरुषांचे स्मारक प्रेरणा देणारे ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करत शहरवासीयांची मागणी पूर्ण केल्याबद्दल पालकमंत्री दादा भुसे यांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली यावेळी रिपाई जिल्हाध्यक्ष भारत जगताप यांनी समस्त मालेगाव करांतर्फे खासदार शिंदे यांचा सत्कार करत आभार मानले.

मोसम पुलाचे उद्घाटन
येथील शिवतीर्थालगत असलेल्या मोसम नदीवरील नगर विकास विभागाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन फुलाचे आज पालकमंत्री दादा भुसे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले .गत एक वर्षापासून एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वाहन चालकांना सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता.पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहने खिळखिळी होत होती.मात्र आज नवीन पूल वाहतुकीसाठी खुला केला गेल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या