Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याहवाई प्रवासादरम्यान मद्यधुंद प्रवाशाचे गलिच्छ वर्तन; एअर होस्टेसच्या संयमाचे होत आहे कौतुक

हवाई प्रवासादरम्यान मद्यधुंद प्रवाशाचे गलिच्छ वर्तन; एअर होस्टेसच्या संयमाचे होत आहे कौतुक

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या काही दिवसांपासून हवाई प्रवासात काही बेजबाबदार आणि खोडसाळ प्रवाशांच्या कारनाम्याचे वेगवेगळे तापदायक किस्से देशभरातच नव्हे तर देशाबाहेरही चर्चिले जात आहेत.

- Advertisement -

असाच एक प्रकार इंडिगोच्या (IndiGo flight) फ्लाइटमध्ये घडला आहे, मद्यधुंद प्रवाशाने घाणेरडे कृत्य करत प्रवासातील अन्य प्रवाशी आणि तेथील कर्मचारी यांना त्रास देण्याचे संतापजनक कृत्य केले आहे.

गुवाहाटीहून (Guwahati) दिल्लीला जाणाऱ्या 6E 762 या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने दारू प्यायल्याने त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटले होते.

रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना; 25 हून अधिक भाविक पडले विहिरीत

प्रवासादरम्यान हा प्रवासी टॉयलेटला जाण्यासाठी उठला; मात्र नशेच्या अवस्थेत त्याने विमानाच्या मध्य भागातच उलट्या केल्या.

एवढेच नाही तर यानंतर त्याने टॉयलेटच्या बाहेर लघवीही केली. तो इतका दारूच्या नशेत होता की, त्याला टॉयलेटच्या बाहेर लघवी केल्याचेही कळले नाही.

Video : राम जन्मला गं सखे…! नाशकात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

26 मार्च रोजी इंडिगो फ्लाइटमध्ये ही घटना घडली. मद्यधुंद प्रवाशाने उलट्या केल्यानंतर अशा वातावरणात इतर प्रवाशांना बसणे अत्यंत कठीण झाले होते. त्यामुळे ऑन-बोर्ड एअरहोस्टेसला विमानातील उलटी पुसावी लागली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ही घटना गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या (Guwahati High Court) वरिष्ठ वकिलाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. यानंतर त्यांनी या घटनेचा फोटो समाज माध्यमात शेअर केला आहे. दरम्यान हा प्रकार हातळणाऱ्या एअर होस्टेसचे (Air hostess) कौतुक होत आहे. मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने विमान प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या