Saturday, September 21, 2024
HomeनगरAhmednagar District Bank : जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपात ‘डोळे झाक’

Ahmednagar District Bank : जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपात ‘डोळे झाक’

अहमदनगर | प्रतिनिधी

- Advertisement -

अनेक वर्षांपासून मोठा नावलौलिक आणि शेतकर्‍यांची बँक असणार्‍या जिल्हा सहकारी बँकेने गेल्या काही वर्षांत बडे कर्जदार असणार्‍या साखर कारखान्यांना कर्ज वाटपात गोंधळ घातल्याचे सहकार खात्याच्या निदर्शनास आले आहे.

बँकेने साखर कारखान्यांना दिलेल्या इतर कर्जाच्या वेळी खिरापतीप्रमाणे पैसे वाटल्याचे दिसत आहे. यात काही कारखान्यांना कर्ज देताना नोंदणीकृत गहाण खत व कर्ज रक्कमेच्यापटीत पूर्ण तारणखत न घेता कर्ज दिले असल्याचे दिसत आहे.

जिल्हा बँकेच्या अनेक बाबी कर्ज वितरण, नफा तोटापत्रक, विविध खाती, त्यावरून झालेले व्यवहार यावर सहकार खात्याने बोट ठेवत प्रश्‍न उपस्थित केले आहे. सहकार खात्याने बँकेच्या कामकाजावर घेतलेल्या आक्षेपांची संख्या मोठी आहे. यातील अनेक बाबी या बँकिंगच्या भाषेत गंभीर असल्या तरी बँकेच्या प्रशासनाच्यावतीने लेखापरिक्षक (ऑडीटर) हे असे आक्षेप नोंदवत असतात.

हे हि वाचा : नोटाबंदीतील कोट्यवधींचे गौडबंगाल आजही अनुत्तरीत

बँकेच्यावतीने नोंदवलेल्या आक्षेपानुसार कागदपत्रांच्या आधारे खुलासा करण्यात आला आहे किंवा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, बँकेचे अनेक निर्णय आश्‍चर्यकारक असून ते सामान्य सभासदांच्यादृष्टीने घात असल्याचे दिसत आहे. एरवी 1 लाखांच्या कर्जासाठी सभासद शेतकर्‍यांना बँकेच्या किती चकरा माराव्या लागतात. शिवाय कागदपत्रांची जंत्रीच जोडावी लागते. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास त्यांना कर्जासाठी किती वेळ ताटकळत ठेवण्यात येते, हे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी अनुभवलेले आहे. यामुळे बँकेच्या सामान्य शेतकरी सभासदांना एक न्याय आणि अन्य बड्या ग्राहकांना वेगळा न्याय, असे चित्र निर्माण झाले आहे.

सहकार विभागाच्या आक्षेपानुसार जिल्हा बँक प्रशासनाने एका साखर कारखान्यास 15 कोटींचे मध्यम मुदतीचे कर्ज दिले होते. मात्र, त्यासाठी संबंधित कारखान्याकडून आवश्यक नोंदणीकृत तारण गहाण करून घेण्यात आलेले नाही. तसेच एका शेती संघास 1 कोटी 35 लाखांचे कर्ज देताना त्यांच्याकडून अवघी 35 लाख रुपयांचे तारण गहाणखत करून घेण्यात आलेले आहे. हा प्रकार कमी-अधिक प्रमाणात अन्य तालुक्यात झालेला दिसत आहे. यामुळे बँकेच्या विश्‍वासहर्तेवर प्रश्‍न निर्माण झाला असून बँक सहकार विभागाच्या आक्षेपावर काय खुलासा करणार, याकडे जिल्ह्यातील सभासदांचे लक्ष लागले आहे.

हे हि वाचा : जिल्हा बँक : मागील वर्षीच्या नफ्यातही कोटीकोटींची ‘बनवाबनवी’?

पेट्रोल डिजेलवर 1 कोटीचा चुराडा

जिल्हा बँकेचे नाव मोठ असल्याने तिच्या वारेमाप खर्चाचे आकडेदेखील मोठे आहेत. बँकेच्या अहवालात मागील वर्षीच्या खर्चाच्या तपशिलात जिल्हा बँकेच्यावतीने बँकेच्या मोटार दुरूस्ती व पेट्रोल- डिझेल खर्चासाठी 2022-23 मध्ये 79 लाख 36 हजारांचा चुराडा केलेला आहे. आता 2023-24 मध्ये यासाठी 1 कोटींची (100 लाख) तरतूद केलेली आहे. वाढत्या महागाईचा बँकेच्या पेट्रोल, डिझेलच्या खर्चावर परिणाम होणारच. शेतकरी हितासाठी बँकेच्या प्रशासनासह संचालकांना किती फिरावे लागते, अशी मिश्किल प्रतिक्रिया बँकेच्या झालेल्या खर्चावर सामान्य सभासदाने दिली आहे.

हे हि वाचा : राज्य बँकेतील मुदत ठेवी 1 हजार कोटींनी घटल्या!

- Advertisment -

ताज्या बातम्या