Tuesday, September 17, 2024
HomeUncategorizedपुणेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग

पुणेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग

- Advertisement -

वणी । वार्ताहर Vani

वणी व परिसरात गेल्या तिन दिवसांपासून पडणार्‍या सतत पावसामुळे वणी परीसरातील धरणांच्या जलाशयात वाढ झाली असून पुणेगाव धरणातून 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.

वणी व परिसरात असलेल्या पुणेगाव, ओझरखेड व तिसगाव धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून पूणेगाव धरणात सुमारे 75 ते 80 टक्के पाणी साठा झाला आहे. पश्चिम भागात पावसाची संततधार कायम आहे. धरणातील 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती शाखाधिकारी विक्रम डावरे यांनी दिली.

ओझरखेड धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. काल सकाळी 11 वाजेपर्यंत 128 एमसीएफटी इतकी वाढ झाल्याची माहीती शाखाधिकारी भुषण कुवर यांनी दिली. तिसगाव धरणाच्या जलाशयात वाढ झाली असल्याची माहिती शाखाधिकारी वृषाली मोहीते यांनी दिली.सततच्या पडणार्‍या पावसामुळे भाताच्या लागवडीस शेतकऱ्यांनी जोमाने सुरवात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या