Friday, May 17, 2024
Homeधुळेधुळ्यात नगावबारी परिसरात धुमश्चक्री, गोळीबारची चर्चा

धुळ्यात नगावबारी परिसरात धुमश्चक्री, गोळीबारची चर्चा

धुळे । Dhule । प्रतिनिधी

शहरातील देवपूर भागातील नगावबारी (Nagaonbari area) येथे आज दोन गटात तुफान धुमश्चक्री (Storm smoke in two groups) उडाली. त्यात हत्यारांचाही वापर करण्यात आला. तसेच पिस्टलद्वारे गोळीबार (Firing by pistol) झाल्याची जोरदार चर्चा होती. यात एकजण जखमी (One injured) झाल्याचे कळते. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

- Advertisement -

नगावबारी परिसरातील कदमबांडे नगरात अष्टकोनी ओटा येथे मागील भांडणाच्या कारणावरून एका टोळीचा प्रमुख आणि नेहरु नगरातील गट आज दुपारी आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. त्यात हत्यारांचाही वापर करण्यात आला आणि गोळीबार ही झाल्याची जोरदार चर्चा आहे.

या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर संशयितांची धरपकडची सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान या दोन्ही गटात यापूर्वी देखील हाणामारी झाली आहे. त्यांच्यावर देवपूर पोलिसांत गंभीर गुन्हेही दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या