Wednesday, December 4, 2024
Homeशब्दगंधकौतुकमिश्रित आश्चर्याचे धनी तीन राजकारणी

कौतुकमिश्रित आश्चर्याचे धनी तीन राजकारणी

– ल.त्र्यं.जोशी

गेल्या आठवड्यात अ‍ॅनलायझर या यू-ट्यूब चॅनेलचे सुशील कुलकर्णी यांनी शरद पवारांवर सादर केलेल्या कार्यक्रमाचा मथळा होता ‘शरद पवार एक समृद्ध अडगळ’. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू एक समृद्ध अडगळ’ नावाच्या कादंबरीवर बरीच चर्चा झाल्यामुळे कुलकर्णींना शरद पवारांना अडगळीत ढकलावेसे वाटणे स्वाभाविकच आहे. तेच सूत्र पुढे नेऊन मी असे म्हणू इच्छितो की, भारतीय राजकारणात तेवढेच समृद्ध असलेले आणखी तीन नेते आहेत. मी त्यांना अडगळ म्हणणार नाही पण ‘कौतुकमिश्रित आश्चर्याचे धनी म्हणू इच्छितो. त्यांच्या राजकारणात टिकून राहण्याच्या प्रयत्नांचे आणि चिकाटीचे कौतुक करु इच्छितो व त्यांना मिळत नसलेल्या यशाबद्दल कीवही करु इच्छितो. एव्हाना ती तीन नावे लक्षात आली असतीलच. पण सांगतो. ती तीन नावे आहेत निवडणूक रणनीतिकार म्हणून मिरविणारे प्रशांत किशोर, मनसेचे झुंझार अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रीय नेता बनण्याच्या आकांक्षेने पछाडलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव. कुणाला चौथे नाव आठवू शकते पण स्पेशल केस म्हणून तूर्त ते नाव बाजूला ठेवतो.

- Advertisement -

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर हे नाव कुणालाही आठवत नव्हते. पण त्या निवडणुकीत मोदींच्या विजयाची चर्चा जस-जशी होत होती तस-तसे प्रशांत किशोर यांचे नाव पुढे येत होते. मोदींच्या त्या निवडणुकीचे व्यवस्थापन त्यांनी केले, असे माध्यमातून पसरु लागले. स्वतः मोदींनी त्याबाबत कुठेही उल्लेख केला नाही वा इन्कारही केला नाही. पण त्यानिमित्ताने निवडणूक रणनीती हा एक व्यवसाय असू शकतो, अशी भावना सर्वत्र पसरु लागली व प्रशांत किशोर यांची मागणी वाढू लागली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यानी विधानसभा निवडणुकीत त्यांची सेवा घेतल्याच्या बातम्या पसरु लागल्या. अर्थात त्यांना त्यांची फी देऊन.

इंटलेक्चुअल प्रॉपर्टीच्या या काळात निवडणूक रणनीतीचे शास्त्र असू शकत नाही, असे कुणीही म्हणणार नाही पण त्याच्या आधारे निवडणुका जिंकल्या जाऊ शकतात यावर विश्वास बसणे कठिण आहे. एकेकाळी इंडिया व्होट्स या लाहिरी प्रभृतीनी लिहिलेल्या पुस्तकामुळे भारतात निवडणूक विश्लेषण शास्त्राचा उदय झाला. पुढे डॉ.प्रणव रॉय यांनी त्याला चालना दिली. त्यातूनच एक्झिट पोलच्या निमित्ताने निवडणूक अंदाज शास्त्राचा जन्म झाला. पण निवडणूक रणनीतीशास्त्राचे भारतातील जनक म्हणून प्रशांत किशोर यांचेच नाव घ्यावे लागेल. अर्थात त्यांच्यापूर्वी या विषयाचा विचारच होत नव्हता, असे मात्र नाही. राजकीय नेते प्रत्येक निवडणुकीपूर्वी रणनीतीचा विचार करीतच होते. मतदारसंघाचे स्वरुप, त्याची भौगोलिक स्थिती, जातीनिहाय लोकसंख्या, शिक्षणाचे प्रमाण, मतदारांचे व्यवसाय, आर्थिकस्थिती, प्रभावी लोक, जुने निकाल आदींचा विचार होतच होता. फक्त त्याला शास्त्रीय स्वरुप देण्याचा प्रयत्न प्रशांत किशोर यांनी केला, असे फार तर म्हणता येईल.अर्थात त्यात त्यांची बुध्दिमत्ता किती व मार्केटिंग स्कील किती हा प्रश्नच आहे. कारण या पध्दतीने निवडणुकी जिंकता येतात हे अजून सिध्द व्हायचे आहे. एक्जिट पोल हे जर निवडणूक निकालाचा अंदाज घेणारे शास्त्र आहे, असे मानले तर आतापर्यंत कोणत्याही एक्झिट पोलचे अंदाज अचूक ठरले नाहीत हा इतिहास आहे. आता स्वतः प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात उतरले आहेत. त्यांची पदयात्राही तिकडे सुरू आहे.ते निवडणुकीत आपल्या शास्त्राच्या आधारे जिंकू शकतात काय, हे कळायला खूप प्रतीक्षा करावी लागणार नाही.पण कोणतीही निवडणूक जिंकण्याची अक्षरशः शेकडो कारणे असतात. त्याचे कारण असे की, जगात एका माणसासारखा दुसरा मनुष्य जसा असू शकत नाही तशीच एका निवडणुकीसारखी दुसरी निवडणूक असू शकत नाही हे एव्हाना सिध्द झाले आहे. पण तोपर्यंत तरी प्रशांतकिशोर यांची दुकानदारी चालूच शकते. दुसरे नेते आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे. महाराष्ट्रात मनसेची स्थापना होऊन आता सतरा वर्षे झाली आहेत. या काळात राज यांच्या नेतृत्वामुळे मनसेला राज्य पातळीवरचा पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे व रेल्वे इंजिन हे राखीव चिन्हही मिळाले आहे. शिवाय त्यांना सत्तेच्या आसपास फिरण्याची संधी अद्याप मिळाली नसली तरी खळखट्याकमुळे त्यांचा राज्यात दबदबा निश्चितच आहे. नाशिक महापालिकेत त्याना एकदा सत्तेची संधीही मिळाली आहे पण राज्यभर आपली पक्ष संघटना बांधण्यात मात्र त्याना अद्याप यश मिळालेले नाही. खरेतर महाराष्ट्रसारख्या राज्यात राज्यव्यापी संघटना उभी करण्यासाठी त्याना पुरेसा वेळ मिळाला आहे. पण प्रत्येक जिल्ह्यात, महानगरात त्यांनी संघटना उभी केली असे म्हणता येणार नाही. भलेही प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते असतील पण संघटन आहेच असे ठामपणे म्हणता येणार नाही. मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण डोंबिवली, नागपूर, अमरावती, संभाजीनगर या महापालिका क्षेत्रांबाहेर ते आपले अस्तित्व सिध्द करू शकले नाहीत.

राज ठाकरे यांच्या सभाना प्रचंड गर्दी जमते.ती त्यांच्या घणाघाती वक्तृत्वशैलीचा आस्वादही घेते पण त्यापैकी किती लोकांचे मनसैनिकात किंवा मनसेच्या मतदारांमध्ये रूपांतर होते हा प्रश्नच आहे.

खरे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारस राज ठाकरेच होऊ शकतात असे मानले जात होते. बाळासाहेबांना हे कळत नव्हते असेही नाही पण त्यांनी शिवसेना ही आपली स्वकष्टार्जित सम्पत्ती आहे असे समजून तिचा वारसा आपले सुपुत्र उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपविला.पण सम्पत्ती आणि राजकीय नेतृत्व ह्या दोन अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. उध्दव आणि राज ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. त्यांच्या आवडीनिवडी, रूचीचे विषय आणि क्षमताही वेगवेगळ्या आहेत. पण बहुधा बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमाने वास्तवावर मात केली. तरीही उध्दव ठाकरे यानी शिवसेना सांभाळण्याची, वाढविण्याची पराकाष्ठा केली पण त्याचे काय झाले हे सर्वांसमोर आहे. राज ठाकरे यांच्याकडे शिवसेना सोपविली असती तर काय झाले असते हे मनसेच्या अनुभवावरून स्पष्ट होते. शेवटी राजकारण ते राजकारणच असते. तेथे त्याच्यासाठी आवश्यक असलेले कर्तृत्वच कामी येते. तेथे वारसाहक्क काम करीत नाही हेच खरे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव हे या मालिकेतील तिसरे नेते.आंध्र प्रदेशातून बाजूला होऊन तेलंगणाचे वेगळे राज्य प्राप्त करणे हा राव यांच्या नेतृत्वाचाच परिणाम याबद्दल वाद असण्याचे कारण नाही. तेलंगणा राज्याचे मागणी व वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी यांचे वय जवळपास सारखेच.पण राव यांच्या नेतृत्वामुळे, त्यांनी स्थापन केलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीच्या प्रभावामुळे ते वेगळे राज्य मिळविण्यात आणि तेथे सत्तारूढ होण्यात ते एकदाच नव्हे तर दोनदा यशस्वी झाले. पण त्यांनी सत्ता कधी कुटुंबाहेर जाऊ दिली नाही. तसे त्यांचे राज्यात बरे चालू होते. पण एका क्षणी राष्ट्रीय नेता बनण्याची हुक्का आली आणि मग काय, राव बोले आणि दळ हाले. एका रात्रीतून तेलंगणा राष्ट्र समितीचे भारत राष्ट्र समितीत रूपांतर झाले. कागदोपत्री नोंदीही झाल्या. राष्ट्रीय नेता म्हणून राव साहेब भारताच्या दौर्यावर निघाले, मोदींना सशक्त पर्याय देण्याच्या घोषणा झाल्या पण त्या घोषणांचे वल्गनात कधी रूपांतर झाले हे रावसाहेबांना कळलेच नाही. अजूनही ते राष्ट्रीय नेत्याच्या स्वप्नातून बाहेर पडलेले नाही. भाजपाविरोधी एकही पक्ष त्यांच्यासोबत यायला तयार नाही. म्हणूनच की, काय त्यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळविला पण अद्याप महाराष्ट्राचा समजला जाणारा एकही नेता त्यांच्या गळाला लागला नाही. अर्थात त्याची चिंता त्याना नाही.कारण राष्ट्रीय नेतृत्वाच्या आकांक्षेने त्यांना पछाडले आहे. आहेत की, नाही तिन्ही नेते कौतुकास्पद आणि आश्चर्यकारकही? एकाला नेता होण्याची ओढ, एकाला राज्याचा नेता होण्याची ओढ आणि एकाला राष्ट्रनेता

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या