पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Sharad Pawar & Ajit Pawar) यांची पुण्यात गुप्त बैठक (Secerete Meeting) झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया (Atul Chordia) यांच्या बंगल्यात ही बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील या बैठकीला होते.
तर, दुसरीडे पुण्यातील चांदणी चौकातील उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार होते. या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होवून अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कोरेगाव पार्क येथील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यामध्ये बैठक झाली अशा चर्चा आहेत. कोरेगाव पार्क मधील बंगला क्रमांक ७३ मध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे बोलले जातेय. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी, असा अंदाज वर्तवला जातोय. मात्र, ज्यांच्या घरी भेट झाल्याची चर्चा आहे त्या अतुल चोरडिया यांनी या भेटीचं वृत्त फेटाळले आहे.
कोल्ड वॉर, खुर्चीवर डोळा अन् झेंडावदन; चांदणी चौकात अजितदादांची तुफान बॅटिंग फटकेबाजी
मागील काही दिवसांपासून शरद पवार-अजित पवार दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात पवार काका-पुतणे यांच्यात ही भेट झाली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर अजित पवार सर्किट हाऊस या ठिकाणी आले. त्यानंतर सरकारी ताफा त्याच ठिकाणी ठेऊन अजित पवार खासगी वाहनाने कोरेगाव पार्क याठिकाणी पोहचले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार हे स्वत: शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. अजित पवार यांच्या काकू प्रतिभा पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. त्यानंतर अजित पवार यांनी दोनवेळा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्यासोबत काही नेत्यांनीदेखील शरद पवारांची भेट घेतली होती.
कोल्ड वॉर, खुर्चीवर डोळा अन् झेंडावदन; चांदणी चौकात अजितदादांची तुफान बॅटिंग फटकेबाजी
यासोबतच, शरद पवार यांनी आपल्यासोबत सत्तेत यावे, अशी विनंती अजित पवार यांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर आज पुण्यात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे कोरेगाव पार्कमध्ये राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते देखील दाखल झाले आहेत.