Tuesday, April 29, 2025
Homeनगरशेतजमिनीच्या बांधाच्या वादातून दोघांना मारहाण

शेतजमिनीच्या बांधाच्या वादातून दोघांना मारहाण

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

शेतजमिनीच्या सामायिक बांधाच्या वादातून (Dispute) चौघांनी दोघांना मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील गोणेगाव येथे घडली असन याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अजित चाँद काझी (वय 34) धंदा-मजुरी रा. गोणेगाव यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 21 जून रोजी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मी माझे घरी असताना माझ्या भावकीतील इसाक मोहम्मद काझी, रिहान अमिन काझी असे दोघेजण माझ्या घरी आले व मला म्हणाले की, मी तुझा सामाईक बाध फोडला नाही तू आमचे नाव का घेतो? असे म्हणून इसाक काझी याने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली व रिहान काझी याने त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने माझे कपाळावर मारुन जखमी (Injured) केले त्यानंतर माझी पत्नी तबासुम ही आमचे भांडण सोडवण्यासाठी आली असता रिहान काझी याच्या हातातील कोयता हिसकावून घेत असताना तिच्या उजव्या हाताला तो लागला.

त्यानंतर महेरु मोहम्मद काझी व असम्मा अमिन काझी अशांनी माझ्या पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली व तुम्ही जर आमच्या विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला जिवेच मारुन टाकीन अशी धमकी (Threat) दिली. या फिर्यादीवरुन वरील चौघांवर भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : बाप नव्हे हा तर हैवान! पोटच्या मुलाची केली...

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जेलरोड परिसरात (Jail Road Area) असलेल्या मंगलमूर्ती नगरमध्ये राहणाऱ्या सुमित भारत पुजारी याने आपला आठ वर्षाचा मुलगा (Son)...