Thursday, January 8, 2026
Homeराजकीय"ए मिटकरी, तुझी पात्रता…"; भाजप नेत्याची अमोल मिटकरींवर शेलक्या शब्दात टीका

“ए मिटकरी, तुझी पात्रता…”; भाजप नेत्याची अमोल मिटकरींवर शेलक्या शब्दात टीका

मुंबई । Mumbai

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. मात्र त्यातच आता महायुतीत (Mahayuti) मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Grop) आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे विश्वासघातकी असल्याचे म्हणत हल्लाबोल केला आहे. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnvis) यांनी घ्यायला हवा. ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली.

YouTube video player

यातच यानंतर भाजप नेते जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी ए…मिटकरी, तुझी पात्रता आहे का? असे म्हणत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची लायकीच काढली आहे. या सर्व टीकेमुळे महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

हे हि वाचा : सीमेवर जवानांचं रक्षाबंधन, मुस्लिम महिलांनी बांधल्या राख्या… पाहा VIDEO

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला जुन्नरमधील नारायणगावमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले होते. या प्रकारानंतर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मिडिया साइटवरुन ट्वीट करत, भाजपच्या कृत्याचा थेट जाब देवेंद्र फडणवीसांना विचारला. अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणाले, जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे.काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा.आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत श्री देवेंद्रजीनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी मिटकरींनी केली होती.

यावर भाजप नेते जगदीश मुळीक यांनी ट्वीटला प्रत्युत्तर देत थेट मिटकरींवर हल्लाबोल चढवला आहे. जगदीश मुळीक ट्वीट करत म्हणाले, ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची? शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार ! अशा आशयाचे ट्वीट केले आहे. यावर आता अजितदादा गट आणि अमोल मिटकरी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

हे हि वाचा : उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना बाहेर पडावे लागले; शिंदेंचा गंभीर आरोप

दरम्यान काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना लक्ष्य करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना सुपारीबाज नेता म्हणून संबोधले होते. त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाबाहेर अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली होती. यानंतर अमोल मिटकरी आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बराचकाळ वाकयुद्ध सुरु होते. कालांतराने हा वाद शमला होता.

ताज्या बातम्या

टॅरिफ

रशियावर ५०० टक्के टॅरिफ लादणाऱ्या विधेयकाला अमेरिकेत मंजुरी; भारतावरही ‘इतके’ टक्के...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावर ५०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संमत होण्याची...