Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik News : 'आनंदाचा शिधा'चे मंत्री भुजबळ यांच्या हस्ते वितरण; जिल्ह्यातील तब्बल...

Nashik News : ‘आनंदाचा शिधा’चे मंत्री भुजबळ यांच्या हस्ते वितरण; जिल्ह्यातील तब्बल ‘इतक्या’ लाभार्थ्यांना मिळणार लाभ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना (Beneficiaries) आनंदाचा शिधाचा (Anandacha Shidha) लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. शहरातील वीर सावरकर हॉल,सावता नगर, सिडको येथे आंनदाचा शिधा वितरण शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी मंत्री भुजबळ बोलत होते…

- Advertisement -

Uddhav Thackeray : “शिवसेनेची स्थापना भाजपची…”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, नाशिकरोड (Nashik Road) येथील पुरवठा अधिकारी कार्यालय हे त्याचठिकाणी ठेवून शहरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने शहर पुरवठा अधिकारी पदाचे श्रेणीवर्धन करून जिल्हाधिकारी कार्यालय (Collector’s Office) आवारात शहर पुरवठा अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. गौरी गणपती, दिवाळी आणि गुढीपाडवा या तिन्ही सणांना शिधापत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चणाडाळ व १ किलो तेल या चार साहित्यांचा समावेश असलेला संच वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तसेच गौरी गणेशोत्सवानिमित्त सप्टेंबरमध्ये आनंदाचा शिधाचे प्रतिशिधापत्रिका धारकांना ई-पॉस प्रणालीद्वारे केवळ १०० रूपयांत वितरीत केला जाणार असून जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे बीपीएल, पिवळे, प्राधान्य केसरी शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार असून शहरातील २३० रास्त भाव दुकानांतून या शिधा संचाचे वाटप होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

Dindori News : करंजवण, ओझरखेड भरण्याच्या मार्गावर; तीन धरणे भरली, तिसगाव ‘इतके’ टक्के

पुढे बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, आनंदाचा शिधा हा शिधापत्रिकाधारकांचा (Ration Holders) हक्क असून प्रत्येक शिधापत्रिकाधारकांपर्यंत हा लाभ पोहचला पाहीजे. या कामात कोणतीही हयगय होणार नाही याची अधिकारी व रास्त भाव दुकानदार यांनी दक्षता घ्यावी अशा सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी योवळी दिल्या. येत्या दोन ते तीन दिवसांत रास्त भाव दुकानदारांनी आनंदाचा शिधा वितरण पूर्ण करावे तसेच जर वाहतुकीत पावसामुळे हा शिधा जर खराब झाला तर त्याची तपासणी करण्यात यावी व खराब संचाचे वितरण नागरिकांना करण्यात येवू नये, अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

Nashik News : ठाकरे गटाला धक्का; बबनराव घोलप यांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा

दरम्यान, या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, सहाय्यक पुरवठा अधिकारी कैलास पवार, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, भाग्यश्री ढोमसे, प्रतिभा पवार, आर.आर पाटील, सिडको विभाग अध्यक्ष अमोल नाईक, मकरंद सोमवंशी, बाळासाहेब गीते, दत्ताकाका पाटील, प्रा.ज्ञानेश्वर महाजन, रवींद्र पाटील, मुकेश शेवाळे, संतोष भुजबळ, रवींद्र शिंदे, अक्षय परदेशी, दिलीप तुपे, आबा आमले यांच्यासह यांच्यासह रास्तभाव दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Video : नैताळेत आमरण उपोषणास सुरुवात; छत्रपती संभाजीराजेंनी दिली उपोषणस्थळी भेट

- Advertisment -

ताज्या बातम्या