Monday, May 27, 2024
Homeधुळेधुळे जिल्ह्यात 324 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

धुळे जिल्ह्यात 324 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

धुळे – प्रतिनिधी Dhule

यंदाच्या खरीप हंगामात पीक पेऱ्यासाठी शेतकऱ्यांना वेळेत भांडवलाची उपलब्धता व्हावी म्हणून धुळे जिल्ह्यासाठी 684 कोटी रुपयांचा पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत 33 हजार 621 सभासदांना 324 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत झाले आहे, तर महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jotirao Phule) शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 44 हजार 847 शेतकऱ्यांना 340 कोटी 81 लाख रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे, अशी माहिती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, खार विकास जमिनी, बंदरे आणि विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Minister of State Abdul Sattar) यांनी येथे दिली.

- Advertisement -

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, (Collector Jalaj Sharma) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे (निवडणूक), गोविंद दाणेज (रोहयो), सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी आदींसह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री.सत्तार यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यात महाआवास अभियान पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट तालुका, क्लस्टर, ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक वितरीत करण्यात आले. तसेच कोविड 19 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी कोविड 19 या साथरोगात मृत्युमुखी पडलेले डॉक्टर, आरोग्य सेवक, अधिकारी व कर्मचारी, नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेले नागरिक, देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिली आहे. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. जून, जुलै महिन्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. मात्र, ऑगस्टचे पहिले 15 दिवस आज पूर्ण होत आहेत. मात्र, पाऊस रुसलाच आहे. असेच चित्र राहिले, तर नैसर्गिक आपत्ती ओढावण्याची चिन्हे आहेत. मात्र, शेतकरी, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व राहील.

रोजगार हमी योजनेची कामे सेल्फवर

जिल्ह्यात खरीप हंगामात 3 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 535 मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 227 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. असे असले, तरी पावसाची आता नितांत आवश्यकता आहे. पावसा अभावी तलाव, धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा झालेला नाही. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2021 मध्ये जिल्ह्यातील 49 हजार 182 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यात बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यामधून 41 हजार 552 हेक्टर क्षेत्राचा विमा काढण्यात आला असून 166.69 कोटी रक्कम संरक्षित केलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या