Friday, November 22, 2024
HomeनाशिकLoksabha Election 2024 : नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप

Loksabha Election 2024 : नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या (Nashik and Dindori Loksabha)दोन्ही जागांसाठी सोमवारी (दि.६) रोजी माघारीची प्रक्रीया पार पडली. त्यानंतर लगेचच निवडणुकीतील उर्वरित अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे (Election Symbol) वाटप करण्यात आले. यात नाशिकमधून अपक्ष लढत देणारे शांतीगिरी महाराज यांना बादली तर वंचितचे करण गायकर यांना गॅस सिलिंडर चिन्ह मिळाले आहे.

- Advertisement -

काल लोकसभा निवडणूकीत माघारीची प्रक्रीया अत्यंत शांततेत पार पडली. उमेदवारी अर्ज माघारीनंतर नाशिकमध्ये ३१ आणि दिंडोरीत १० उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. माघारीनंतर कोणता उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात अंतिमत: राहणार तसेच कोणत्या उमेदवाराला (Candidate) काय चिन्ह मिळते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. त्यानुसार दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमांनुसारच चिन्हाचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, चिन्ह वाटपावेळी कुणा उमेदवाराला फुगा तर कुणाला शिट्टी मिळाली आहे. याशिवाय प्रेशर कुकर, टेबल, ट्रक, जहाज, ट्रे, तुतारी, सोफा अशी विविध चिन्हांचे उमेदवारांना वाटप केले गेले. नाशिकमधून लोकसभेसाठी नशिब आजमावणारे सिद्धेश्वरानंद गुरु स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांना संगणक चिन्ह मिळाले आहे. कांतीलाल जाधव यांना कोट, आपचे कैलास चव्हाण यांना किटली मिळाली आहे. तर अपक्ष जितेंद्र भाभे यांना बॅट ही निशाणी मिळाली आहे. पुढील १२ दिवसांमध्ये उमेदवार त्यांचे चिन्ह घेऊन मतदारांसमोर जाऊन जोरदार प्रचार करतील.

उमेदवार कंसात त्यांचा पक्ष व चिन्ह

नाशिक मतदारसंघ

हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गट (धनुष्य बाण), राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गट (मशाल), अरुण काळे बसपा (हत्ती), करण गायकर वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलिंडर), महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज अपक्ष ( बादली), स्वामी सिद्धेश्वरानंद गुरु स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती (संगणक), जितेंद्र भाभे अपक्ष(बॅट), चंद्रकांत ठाकूर अपक्ष (सीसीटीव्ही कॅमेरा), वामन सांगळे धर्मराज्य पक्ष (टेबल), आरिफ मन्सुरी अपक्ष( हिरा), दीपक गायकवाड अपक्ष (आगपेटी), अमोल कांबळे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी (प्रेशर कुकर), तिलोत्तमा जगताप अपक्ष (खाट), यशवंत पारधी भारतीय अस्मिता पार्टी (ऑटो रिक्षा), भाग्यश्री अडसुळ इंडियन पिपल्स अधिकार पार्टी ( फुगा), चंद्रकांत पुरकर अपक्ष (जहाज), गणेश बोरस्ते अपक्ष (गॅस शेगडी), सोपान सोमवंशी अपक्ष( शिवण यंत्र), सुषमा गोराणे अपक्ष (सोफा), कोळप्पा धोत्रे अपक्ष( ट्रक), सचिन देवरे अपक्ष( ट्रे), जयश्री पाटील सैनिक समाज पार्टी( द्राक्ष), देविदास सरकटे अपक्ष (सफरचंद), कमलाकर गायकवाड दलित शाेषित पिछडा वर्ग अधिकारी दल( हार्मोनियम), कैलास चव्हाण आम आदमी पार्टी (किटली), कांतीलाल जाधव आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया (कोट), दर्शना मेढे प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी (उस शेतकरी), झुंझार आव्हाड, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (शिट्टी), प्रकाश कनोजे अपक्ष (इस्त्री), धनाजी टोपले अपक्ष (रोड रोलर) सुधीर देशमुख अपक्ष( तुतारी)

दिंडोरी मतदारसंघ

भास्कर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, (तुतारी वाजविणारा माणूस), डॉ. भारती पवार भाजप( कमळ), तुळशीराम खोटरे बहुजन समाज पार्टी ( हत्ती), किशोर डगळे, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया (कोट), गुलाब बर्डे प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी (बॅट), मालती थविल वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलिंडर), बाबू भगरे, अपक्ष (तुतारी), अनिल बर्डे अपक्ष (रुम कुलर), दीपक जगताप अपक्ष (शिट्टी), भारत पवार बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (ऑटो रिक्षा)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या