नाशिक | प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने रविवार, दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे सन २०२०, २०२१, व २०२२ या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, शेतकरी संस्था, अधिकारी आदींना एकूण ४४८ राज्य कृषी पुरस्काराने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते तसेच राज्याचे मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री मा.दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री मा.दिपक केसरकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारार्थीना सन्मानित करण्यात आले.
सन २०२०, २०२१, व २०२२ मधील शेती व शेती पुरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी बाधव व संस्थाना कृषी विभागामार्फत डॉ. पजाबराव देशमुख कृषीरत्न, वसतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण सेंद्रिय शेती, वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यान्न पडीत, वसतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी याच्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार विजेते शेतकरी तसेच सन २०२०, २०२१, व २०२२ मधील राज्यस्तरीय पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला. या पुरस्कारासाठी नाशिक जिल्यात ३१ पुरस्कारार्थी शेतकरी यांचा समावेश असून यामध्ये पीकस्पर्धा योजनेचे १५ शेतकरी व प्रगतशील शेतकरी १६ अशा एकूण ३१ शेतकऱ्याना पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे.
नाशिक जिल्यातील ३१ पुरस्कारार्थी
खरीप व रब्बी हंगाम पीक स्पर्धा राज्यस्थरीय विजेते पुरस्कारार्थी.
नारायण तुंगार, चौसाळे ता. दिंडोरी, सुहास बर्वे , डुबेर, ता. सिन्नर., आप्पासाहेब आरोटे, महाजनपूर ता. सिन्नर, शिवाजी सोमवंशी, सुंदरपूर, ता. निफाड, बाजीराव चौरे, बाभुळणे ता. सटाणा, देवाजी पवार, माळीवाडे, ता. सटाणा, रामदास चौधरी, अजंदे ता. सटाणा, विठ्ठल आवारी, साकुर, ता. इगतपुरी, सोमनाथ पेखळे, माडसांगवी नाशिक, श्रीराम मते, वासाळी नाशिक, सोमनाथ बेंडकोळी, धोंडेगाव नाशिक, शांताबाई चौधरी, मेहेदर, ता. कळवण, हरिश्चंद्र गावित, धनेर, ता.कळवण. कैलास पवार, इन्शी ता. कळवण.
विविध कृषी पुरस्कारार्थी
लक्ष्मी मोरे, चौंधाणे, ता. सटाणा, भूषण निकम, विठाई नगर पेठ रोड नाशिक, मुकुंद पिंगळे, ता, नाशिक. जयप्रकाश महाले, ठाणगाव ता, सुरगाणा, सम्रत राऊत, दिंडोरी, नसिक, दामोदर स. दिंडोरी, रामदास देशमुख, ता. सुरगाणा, अनिल भोर, ता. सुरगाणा, रवींद्र पवार, सातमाणे, ता, मालेगाव, बाळासाहेब मराळे, ता, सिन्नर, ज्ञानेश्वर गांगुर्डे, ता. चांदवड, सुनील भिसे, चिंचोली, ता, सिन्नर, हितेंद्र पगार, येवला, संदीप जाधव, ता. चांदवड, सुरेश कळमकर, मोहाडी, ता, दिंडोरी, पूनम डोखळे, खेडगाव, दिंडोरी,
गेल्या २५ वर्षांपासून मी शेवगा शेतीमध्ये प्रगतशील शेतकरी आहे. यामध्ये रोहित १ नवी शेवग्याची नवीन प्रजाती विकसित केली आहे. राज्यामध्ये मी १० हजार शेतकऱ्यांना शेवगा लागवड करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. या कामाची दखल घेता मला कृषी क्षेत्रातील सर्वोच्च डॉ. पजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे. बाळासाहेब मराळे, पुरस्कारार्थी. ता. सिन्नर.