Thursday, December 12, 2024
Homeनाशिकपालकमंत्री भुजबळांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

पालकमंत्री भुजबळांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे (Independence Day) औचित्य साधून पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते नाशिकरोडचे विभागीय आयुक्त कार्यालय येथे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले….

- Advertisement -

पुरस्कार पुढीलप्रमाणे:-

देशातील सीमारेषेवर लष्करी कार्यवाही करतांना सन-2019 मध्ये बालाकोट हवाई हल्ला चालु असतांना बडगाव जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत असतांना 27 फेब्रुवारी 2019 रोजी हेलिकॉप्टर क्रॅश झालेमुळे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे, रा.नाशिक हे शहीद झाले आहेत. त्यांच्या वीर पत्नी, वीर माता व पिता यांना महाराष्ट्र शासनातर्फे एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली, त्यांचा पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला आहे.

3 मार्च 2018 रोजी नायक निलेश अहिरे यांना ऑपरेशन रक्षक दरम्यान जम्मू व काश्मिर येथे कर्तव्यावर असतांना जेंव्हा त्यांची सैन्य तुकडी पेट्रोलिंग करत होती आणि त्यावेळी भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने त्यांना अपंगत्व आले. महाराष्ट्र शासनातर्फे साडे आठ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली असुन, पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला आहे.

26 मार्च 2018 रोजी सकाळी 10:15 वाजता शिपाई भोकरे रावसाहेब धुडकु यांना ऑपरेशन रक्षक दरम्यान जम्मू व काश्मीर येथे कर्तव्यावर असतांना अपंगत्व आले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. पालकमंत्री भुजबळ यांचे हस्ते ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला.

जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावणा-या शासकीय व खासगी रुग्णालय यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये एसएमबीटी महाविद्यालय, नामको हॉस्पिटल नाशिक, सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल नाशिक या रुग्णालयांचा सन्मान करण्यात आला.

पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस पदक व पोलिस शौर्य पदक प्राप्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह, सन्मानचिन्ह यावेळी प्रदान करण्यात आले.

शहर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त सहायक पोलीस उपनिरीक्षक अनंता पाटील व पोलीस हवालदार संतु खिंडे यांना गौरविण्यात आले. पोलीस हवालदार प्रविण कोकाटे, पोलीस हवालदार सगुन साबरे, गुलाब सोनार, संतोष वाणी, बलदेव माधव बोरसे, वसंत धर्माजी पांडव, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, प्रशांत वालझाडे, मिलींद निकम, भुषणसिंग चंदेल, महिला पोलीस हवालदार प्रिती कातकाडे, सुरेशसिंग परदेशी, पोलीस नाईक गणेश फड यांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

पोलीस उपनिरीक्षक अशोक उत्तम अहिरे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतीचे पोलिस पदक, पोलिस उपनिरिक्षक सुदर्शन सुखदेव आवारी, मिलींद शंकरराव तेलुरे, शेख मोहम्मद नजिम अब्दुल रहेमान, सहायक पोलिस उपनिरिक्षक अंबादास जाडर, पोलीस निरीक्षक मनोज गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक निवृत्ती तुंगार, पोलीस हवालदार सुनिल गीत, चालक संजय उध्दव जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक शाम वेटाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना मुरलीधर हरक, पोलीस हवालदार संजीवकुमार काशी माथुर, पोलीस नाईक साधना खैरनार यांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पोलिस ॲकेडमी, नाशिकचे पुरस्कार

पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडील प्रशिक्षण शाखेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. तसेच पशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले आहे.

सुंदर गाव पुरस्कार

जिल्हा परिषदेमार्फत (Zilla Parishad) आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत सन 2019-20 व सन-2020-21 जिल्हा व तालुका सुंदर गाव ग्रामपंचायींचे पारितोषिक वितरण करण्यात आले आहे.

त्यात सन 2019-20 मध्ये निफाड तालुक्यातील आहेरगांव, कळवण तालुक्यातील चणकापुर, सिन्नर तालुक्यातील दातली, बागलाण तालुक्यातील टेंभे खालचे, चांदवड तालुक्यातील सोग्रस, इगतपुरी तालुक्यातील धामणगाव, येवला तालुक्यातील पाटोदा, दिंडोरी तालुक्यातील जानोरी, नाशिक तालुक्यातील ओढा, मालेगाव तालुक्यातील येसगाव बुद्रुक, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले, देवळा तालुक्यातील रामेश्वर, सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा, नांदगाव तालुक्यातील नागापुर, पेठ तालुक्यातील तोंडवळ यांना पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले आहे.

सन 2020-21 मधील निफाड तालुक्यातील ओझर, कळवण तालुक्यातील मेहदर, सिन्नर तालुक्यातील चिंचोली, बागलाण तालुक्यातील नवे निरपुर, चांदवड नन्हावे, इगतपुरी तालुक्यातील नागोसली, येवला तालुक्यातील एरंडगाव खु, दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव, नाशिक तालुक्यातील कोटमगाव, मालेगाव तालुक्यातील बेळगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली, देवळा तालुक्यातील माळवाडी, सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक, नादगाव तालुक्यातील भालुर, पेठ तालुक्यातील बोरवड यांना पुरस्कार देण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांचा गौरव

प्रथम क्रमांक: बागलाण

द्वितीय क्रमांक: देवळा,

तृतीय क्रमांक: त्र्यंबकेश्वर

सर्वोत्कृष्ट क्लस्टर (आवास योजना)

प्रथम क्रमांक: गिरणारे क्लस्टर ता. नाशिक

द्वितीय क्रमांक: साकोरे क्लस्टर ता. नांदगाव,

तृतीय क्रमांक :क्लस्टर वाघेरा ता. त्र्यंबकेश्वर

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत (आवास योजना)

प्रथम क्रमांक: दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत देवपाडा,

द्वितीय क्रमांक: मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचवे,

तृतीय क्रमांक: बागलाण तालुक्यातील शेवरे ग्रामपंचायत

आवास योजनेतंर्गत सर्वोत्कृष्ट वित्तसंस्था

प्रथम क्रमांक: येवला तालुक्यातील जनता नागरी सहकारी बँक

द्वितीय क्रमांक: बागलाण तालुक्यातील बँक ऑफ बडोदा, सटाणा शाखा

तृतीय क्रमांक :आडीबीआय बँक, सटाणा

राज्य पुरस्कृत आवास योजना पुरस्कार

सर्वोत्कृष्ट तालुके (आवास योजना)

प्रथम क्रमांक: सिन्नर ,

व्दितीय क्रमांक: नांदगाव तालुका,

तृतीय क्रमांक: मालेगाव तालुका

सर्वोत्कृष्ट क्लस्टर (आवास योजना)

प्रथम क्रमांक: येवला तालुक्यातील क्लस्टर राजापुर,

व्दितीय क्रमांक: इगतपुरी तालुक्यातील क्लस्टर नांदगाव सदो,

तृतीय क्रमांक: त्रंबकेश्वर तालुक्यातील क्लस्टर अंजनेरी

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत (आवास योजना)

प्रथम क्रमांक: बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायत जामोठी,

व्दितीय क्रमांक: येवला तालुक्यातील ग्रामपंचायत अंगुळगाव,

तृतीय क्रमांक: इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत बोर्ली

आवास योजनेतंर्गत सर्वोत्कृष्ट वित्तसंस्था

प्रथम क्रमांक: बागलाण तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडीया, सटाणा,

व्दितीय क्रमांक: नाशिक मधील गुरुकृपा महिला स्वंयसहाय्यता, नाशिक समुह, साडगाव,

तृतीय क्रमांक: येवला तालुक्यातील बँक ऑफ बडोदा, शाखा पाटोदा

जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, नाशिक स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनदारे गावठाण भूमापन करुन तयार करण्यात आलेल्या मिळकत पत्रिकेचे वाटप शिवाजी तुपे, योगेश तुपे, रामदास डावरे, आनंद तुपे, राजूबाई सयाजी तुपे, सरपंच ग्रामपंचायत कार्यालय बेलू या लाभार्थ्यांना करण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या