Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्हा बँक निवडणूक ठराव देण्यास मुदतवाढ

जिल्हा बँक निवडणूक ठराव देण्यास मुदतवाढ

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रियेबाबत सभासद यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमात नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर या जिल्हा बँकेच्या मतदार यादीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात बँकेच्या संस्था सभासदांच्या निवडणूक प्रक्रिया शिल्लक राहणार आहे. यामुळे या बँकांची निवडणूक प्रक्रिया न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने ठराव पाठविण्याची मुदत 16 जानेवारीवरून 31 जानेवारीपर्यंत वाढवीली आहे.

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी बाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशात राज्यात जिल्हा बँकांच्या सभासद यादीची कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र, अनेक ठिकाणी बँकांच्या संस्था सभासदांची निवडणूक प्रक्रिया शिल्लक आहे. यामुळे या संस्थांच्या प्रतिनिधींना बँकेसाठी निवडणूक लढविण्यास उभे राहणे, मतदान करणे, उमेदवार सुचक असणे, आदीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. यामुळे हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. ही बाब नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर मध्यवर्ती बँकेकडून कळविण्यात आली आहे.

- Advertisement -

यामुळे झालेल्या मागणीनूसार राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा बँकेच्या ठराव मागणीचा कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्वी ठराव अंतिम पाठविण्याची तारीख 16 जानेवारी होती. त्यात 15 दिवसांची वाढ देण्यात आली आहे. आता 31 जानेवारीपर्यंत विकास सोसायट्यांना मतदानासाठी ठराव देत येणार आहे.

असा आहे सुधारित कार्यक्रम
सभासद ठराव मागविण्याची अंतिम तारिख 31 जानेवारी
निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी प्राप्त संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव बँकेस देण्याची अंतिम तारीख 1 फेबुवारी
प्रारूप मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकार्‍यासह सादर करणे 7 फेबु्रवारी
प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी दिनांक 17 फेबु्रवारी
प्रारूप मतदार यादीवर आक्षेप 26 फेबुवारीपर्यंत
आक्षेपांवर निर्णय 6 मार्च
अंतिम मतदार यादी 11 मार्च रोजी प्रसिध्द करणार

- Advertisment -

ताज्या बातम्या