Saturday, July 27, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात 790 बाधितांची रुग्णसंख्येत भर

नगर जिल्ह्यात 790 बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात आज 875 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 35 हजार 644 इतकी झाली आहे.

- Advertisement -

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.69 टक्के इतके झाले आहे. दरम्यान काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 790 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4341 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 148, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 223 आणि अँटीजेन चाचणीत 419 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 70, संगमनेर 03, पाथर्डी 04, नगर ग्रामीण 09, श्रीरामपूर 02, नेवासा 12, अकोले 17, राहुरी 01, शेवगाव 03, कोपरगाव 06, कर्जत 05, मिलिटरी हॉस्पिटल 15 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 223 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 77, संगमनेर 16, राहाता 15, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 26, श्रीरामपुर 18, नेवासा 15, श्रीगोंदा 03, पारनेर 18, अकोले 02, राहुरी 19, शेवगाव 02, कोपरगाव 01, जामखेड 06 आणि कर्जत 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 419 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 17, संगमनेर 79, राहाता 27, पाथर्डी 48, नगर ग्रामीण 06, श्रीरामपूर 21, कँटोन्मेंट 06, नेवासा 06, श्रीगोंदा 22, पारनेर 19, अकोले 41, राहुरी 18, शेवगाव 12, कोपरगाव 28, जामखेड 30 आणि कर्जत 39 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज 875 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 222, संगमनेर 24, राहाता 76, पाथर्डी 50, नगर ग्रा. 54, श्रीरामपूर 41, कॅन्टोन्मेंट 07, नेवासा 81, श्रीगोंदा 32, पारनेर 34, अकोले 46, राहुरी 43, शेवगाव 84, कोपरगाव 37, जामखेड 24, कर्जत 17, मिलिटरी हॉस्पिटल 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 35644

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 4341

* मृत्यू : 665

* एकूण रूग्ण संख्या : 40650

- Advertisment -

ताज्या बातम्या