Friday, May 3, 2024
Homeनगरदिलासा : जिल्ह्यात आज ‘ऐवढ्या’ करोना बाधितांची वाढ

दिलासा : जिल्ह्यात आज ‘ऐवढ्या’ करोना बाधितांची वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात आज 215 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 64 हजार 275 इतकी झाली आहे.

- Advertisement -

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.61 टक्के इतके झाले आहे. दरम्यान काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 123 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1263 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 26, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 45, आणि अँटीजेन चाचणीत 52 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 10, अकोले 01, जामखेड 02, कोपरगाव 03, नगर ग्रामीण 04, श्रीगोंदा 05 आणि कॅन्टोन्मेंट 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 13, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 03, पारनेर 03, राहाता 09, राहुरी 01, संगमनेर 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 52 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 01, जामखेड 03, कर्जत 03, कोपरगाव 08 नगर ग्रामीण 03, नेवासा 02, राहाता 08,संगमनेर 17, शेवगाव 01, श्रीगोंदा 02 आणि श्रीरामपूर 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 57, अकोले 07, कर्जत 06, कोपरगाव 03, नगर ग्रामीण 12, नेवासा 15, पारनेर 11, पाथर्डी 05, राहाता 30, राहुरी 09, संगमनेर 41, शेवगाव 04, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 64275

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 1263

* मृत्यू : 989

* एकूण रूग्ण संख्या : 66527

- Advertisment -

ताज्या बातम्या