Tuesday, May 28, 2024
Homeनाशिकवादग्रस्त लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. झनकर पसार; वाचा सविस्तर

वादग्रस्त लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. झनकर पसार; वाचा सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

वादग्रस्त लाचखोर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर (Nashik Higher secondary education officer Dr vaishali Zankar vir) पसार झाल्या असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. काल सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर महिला संशयितास अटक करता येत नसल्याने झनकर (Dr vaishali Zankar vir) यांच्या नातलगांकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) (anti corruption bureau)समन्स बजावले होते. मात्र आज सकाळी त्या भद्रकाली पोलीस ठाण्यातही दाखल झाल्या नाहीत आणि कोर्टातही त्या आलेल्या नसल्याचे समजते आहे…(Bhadrakali Police Station)

- Advertisement -

८ लाखांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर (Nashik Higher secondary education officer Dr vaishali Zankar vir) यांचा चालक आणि एक शिक्षकास ताब्यात घेतले होते. तब्बल आठ त्यास या दोघांची चौकशी रात्री सुरु होती. पहाटेला भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, डॉ झनकर यांना सकाळी आठ वाजता भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र याठिकाणी त्या हजर झाल्या नाहीत. यानंतर दोघा संशयितांना पोलिसानी आज दुपारी न्यायालयासमोर हजर केले. यावेळीही डॉ झनकर हजर राहिल्या नाहीत त्यामुळे त्या कुठेतरी पसार झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या