Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik Assembly Election 2024 : नांदगाव मतदारसंघातील परिस्थिती नियंत्रणात; जिल्हा निवडणूक...

Nashik Assembly Election 2024 : नांदगाव मतदारसंघातील परिस्थिती नियंत्रणात; जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

नाशिक | Nashik

महाराष्ट्र विधानसभेच्या ११३ नांदगाव मतदारसंघात (Nandgaon Constituency) आज सकाळी दोन उमेदवारांमध्ये (Candidates) मतदारांची (Voter) ओळख पटविणाऱ्यावरुन वाद निर्माण झाला होता. तेथे पोलिस पथक वेळीच दाखल झाले असून लोकप्रतिनिधीत्व कायद्यान्वये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

- Advertisement -

नांदगाव मतदारसंघात एका उमेदवाराने मतदारांच्या ओळखीवरून संशय व्यक्त केला होता. त्यावरून हा वाद निर्माण झाला होता. तथापि, पोलिस, निवडणूक निरीक्षक वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच लोकप्रतिनिधीत्व कायद्यासह आदर्श आचारसंहितेनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मतदारांच्या ओळखीबाबत उमेदवारांना संशय असेल, तर मतदान केंद्रावर मतदान अधिकारी ओळखपत्र पाहून मतदारांची ओळख पटवितात. ते खात्री करूनच मतदारांना मतदानाची परवानगी देतात, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.

तसेच या घटनेमुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मतदान करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...