Monday, October 28, 2024
Homeदिवाळी अंक २०२४सह्याद्रीतील घाटरस्ते

सह्याद्रीतील घाटरस्ते

- Advertisement -

महाराष्ट्र म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात ते अजस्त्र कडे, त्यावरून मुक्तपणे अविरत कोसळणारे असंख्य धबधबे, ताशीव आणि अभेद्य असे दुर्ग आणि त्या पर्वतांच्या अंगाखांद्यावर खेळणारी बागडणारी जीवसृष्टी.पूर्वीच्या काळी ह्या डोंगरातून पलीकडे जाण्यासाठी किंवा दळणवळणाच्या दृष्टीने एक माणूस किंवा घोडे यांना जाता येईल इतकेच हे रस्ते रुंद असायचे पण सध्या आधुनिकिकरणामुळे त्या त्या ठिकाणी अत्यंत प्रशस्त असे घाट रस्ते बनवले गेले आहेत. सोबतच घाटातून आसपासचा निसर्ग बघण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच मोक्याच्या जागा हेरून त्या विकसित केल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असे कित्येक घाटरस्ते आहेत की जिथून आपल्याला निसर्गसौंदर्य न्याहाळता येते तेही प्रवास करता करता. उदाहरण द्यायचे झाले तर सुप्रसिद्ध माळशेज घाट घ्या, जो मुरबाड ते आळेफाटा यांना जोडतो. पावसाळयात इंद्राची नगरी ज्यापुढे फिकी पडेल असा निसर्ग आणि मनमोहक देखावे आपल्याला ह्या घाटातून दिसतात पण अशाच प्रकारचे उत्तर महाराष्ट्रातील काही घाट जे बर्‍यापैकी आपल्याला अपरिचित आहेत त्यांची थोडक्यात माहिती आपण आज बघणार आहोत.

महाराष्ट्राच्या उत्तरेला असणार्‍या नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांग असलेल्या ह्या भागात वनवासी/आदिवासी बहुल असे क्षेत्र आहे जेथे अनेक घनदाट जंगले आहेत. धुळ्याहून सुरत(गुजरात) कडे जात असताना नवापूरच्या आसपास एक अत्यंत तिखट वळणाचा घाट लागतो जो घनदाट जंगलातून जातो. एका बाजूने संथ वाहणारी नदी आणि दुसर्‍या बाजूला उंचच उंच कडे. ह्याच भागात महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे तोरणमाळ हे निसर्गरम्य आणि थंड हवेचे ठिकाण आहे. यशवंत तलाव, सीता-खायी दरी, अतिशय हिरवेगार नैसर्गिक सौंदर्य, डोंगर, दर्‍या-खोर्‍या,असंख्य धबधबे असे वसुंधरेचे नटलेले रूप आपल्याला ह्या भागात दिसते.

निसर्गाच्या वैविध्याने पूर्णपणे बहरलेला असा हा भाग आहे. येथे होळी हा प्रमुख सण मानला जातो. प्रामुख्याने आदिवासी संस्कृतीतली होळी ही मोठ्या स्वरूपात होत असून तत्पश्चात भरणार्‍या बाजारास भोंगर्‍या बाजार असे म्हणतात.ह्याच भागात अक्कलकुवा तालुक्यातील पर्यटकांना आकर्षित करणारा प्रसिद्ध बोरकी धबधबा हा देवनंद नदीवर उमटी गावात आहेत. हिडिंबाचे जंगल तसेच शहादा तालुक्यातील गरम पाण्याचे झरे आणि प्रकाशा हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले तीर्थ क्षेत्र ह्याच भागात आहे. तोरणमाळच्या जंगलात वाघ,बिबटे, तरस,कोल्हा, हरण,वानर,रानडुक्कर आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती ह्या जंगलात आढळून येतात. साग,खेर,अंजन बाभूळ, आंबा आणि चंदनाचे वृक्ष आपल्याला ह्या भागात प्रामुख्याने दिसून येतात. हा भाग शासनाच्या नाशिक प्रशासकीय विभागात समाविष्ट आहे.

त्यानंतर नाशिकपासून अवघ्या 91 किमी वर असणार्‍या आणि महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणार्‍या सापुतारा घाटाचे नाव आपण ऐकलेच असणार. हा घाट सीमेवर जरी असला तरी ह्याचा काही भाग आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ह्या भागात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. सनराईज आणि सनसेट पॉईंट, गीरा धबधबा, बोटिंग, इको पॉईंट आणि रोप वें सारख्या अनेक मनोरंजनाच्या प्रकारांमुळे ह्या ठिकाणीं पर्यटक अक्षरशः खेचले जातात. पॅराग्लायडिंग सारखे साहसी खेळही ह्याठिकाणी उपलब्ध आहेत. पावसाळ्यात सापुतारामधील एका उंच ठिकाणीं गेले असता आपल्याला दरीत ढगांची चादर बघावयास मिळू शकते.

नाशिकहून धुळ्याकडे जाताना मुंबई-आग्रा हायवेवरून पुढे गेले असता चांदवडच्या पुढें एक घाट लागतो. हा रस्ता 4 लेन होण्याच्या आधी हा घाट चांगलाच प्रसिद्ध होता. पूर्वी घाटात अगदी रस्त्यावरच रेणुका मातेच्या देवळाचे प्रवेशद्वार होते. ह्या घाटातून आपल्याला सह्याद्रीचे अजस्त्र आणि अभेद्य पण मनमोहक आणि आकर्षक रूप पावसाळयात दिसून येते. ह्या घाटाच्या बाजूला टेकडीवर चंद्रेश्वर महादेवाचे देऊळ आहे. पावसाळ्यात देवळाच्या मागील भागातून प्रचंड धबधबा मुक्तपणे दरीत कोसळत असतो, जणू महादेवाच्या जटांमधून गंगा पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. हे विहंगम दृश्य आपल्याला रेणुका मातेच्या देऊळ परिसरातून दिसते.

ह्याच परिसरात डोंगरात एका गुफेत जैन पंथियांची दैवते आणि हिंदू धर्मातील कालिका माता आणि गणपति बाप्पा यांच्या दगडात कोरलेल्या सुबक मूर्ती आहेत. घाटाच्या एका बाजूला असलेल्या पर्वत शृंखलेत धोडप नावाचा एक अभेद्य किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूंसाठी कारागृह म्हणून उपयोगात होता.हीच पर्वत शृंखला पुढे गुजरातच्या सीमेपर्यंत गेलेली आहे.ज्यात प्रसिद्ध आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेर किल्ला आहे तसेच बाजूला मुल्हेर किल्ला देखील आहे. मुल्हेर हे मध्ययुगीन भारतात बागुल राजांचे प्रभावाखालील एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते आणि त्यामुळेच ह्या भागाला बागलाण असे नाव पडले आहे.मुल्हेर गावापासून जवळच मांगी तुंगी हे ठिकाण आहे तिथे जैन पंथीयांच्या तिर्थांकरांची जवळ्पास 108 फूट उंच मूर्ती आहे तसेच ह्या पर्वताच्या दोन्ही बाजूला परिक्रमा करीत असताना अनेक जैन व हिंदू देवतांच्या मूर्ती ह्या आपल्याला कोरलेल्या दिसतात. मुल्हेर गावात संत पुरुष उद्धव महाराज यांचे मंदिर आहे जे मध्ययुगीन कालखंडात मुल्हेरक्षेत्री होऊन गेलेत.

नाशिकहून मुंबईकडे जाताना कसारा घाट लागतो. घोटी/इगतपुरीच्या पुढे गेल्यावर ह्या घाटाला सुरुवात होते. पावसाळ्यात ह्या घाटातून प्रवास केल्यावर जणू हाच स्वर्ग अशी अनुभूती आल्यावाचून राहणार नाही. घोटीहून आपल्याला अलंग मदन आणि कुरंग हे अभेद्य किल्ले तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजेच कळसूबाई शिखर ह्या ठिकाणीं जाता येते. ह्याच परिसरात सुप्रसिद्ध अशी सांधण दरी देखील आहे. अनेक प्रकारचे धबधबे, गर्द जंगल आणि मानव निर्मित धरणे ह्या परिसरात आहे त्यामुळे पर्यटकांची पावले इकडे आपोआपच वळतात.येथील जंगलात प्रामुख्याने आंबा, जांभूळ, चंदन, साग असे नानाविध प्रकारचे वृक्ष आढळतात आणि वाघ, बिबट्या, अस्वल, हरण, ससा, रानडुक्कर असे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील अजून एक भाग म्हणजे जळगाव जिल्हा,ह्याच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 जातो. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा एक महत्वाचा मार्ग आहे. ह्या मार्गावर 40 गाव सोडल्यावर छ.संभाजीनगरकडे जाताना कन्नड घाट लागतो. घाट तसा 8-10 किमी चा, पण कठीण श्रेणीत येतो. सह्याद्रीची उपरांग आसलेल्या अजिंठा सातमाळ ह्या पर्वत मालिकेत हा भाग आहे.इथे गौताळा अभयारण्य आहे.ह्या अभयारण्याचा काही भाग हा नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये येतो तसेच उर्वरित भाग हा जळगाव जिल्ह्यातील 40गाव आणि छ. संभाजीनगर मधील कन्नड/सिल्लोड तालुक्यात येतो.

पावसाळयात ह्या घाटातून जाताना अत्यंत विलोभनीय असे दृश्य दिसते. घाटाच्या मधून एक मार्ग डोंगराच्या वरील बाजूस जातो तिथे खंडेरायाचे देऊळ आहे. परिसरातील गौताळा अभयारण्यात पाटणादेवीचे सुंदर मंदिर आहे.तसेच यादवकालीन महादेवाचे देऊळ, पितळखोरे लेण्या, केदारकुंड धबधबा आणि शून्याचे शोधकर्ते भास्कराचार्य ह्यांचे स्मारक ह्या परिसरात आहे. ह्या राष्ट्रीय महामार्गाने छ. संभाजीनगर कडे पुढे गेल्यावर आपल्याला घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या लागतात. येथील जंगलात बिबट्या, रानडुक्कर, तडस, अस्वल, हरीण, ससे, रानमांजर प्रामुख्याने दिसून येतात. तसेच वड, पिंपळ,कडुनिंब, आंबा,सीताफळ,खेर,बाभूळ,अंजन निलगिरी,चंदन आणि साग वृक्ष आढळून येतात.

प्रत्येक घाटाचे असं वैशिष्ट्य आहे जे एकाच आहे ते दुसर्‍यात नाही. त्यामुळे सगळ्या घाटांमधला प्रवास हा एकदा कधी ना कधीतरी केलाच पाहिजे आणि तो एकदा अनुभव घेतल्यानंतर आपल्याला त्या त्या परिसरातील निसर्ग म्हणजे काय ते नक्की कळेल. सपाट गाळ प्रदेशातून वाहतात. जिथे त्या संंथ गतीने वाहतात किंवा उंच प्रदेश आणि पठारांंमधून प्रवाहित होतात, जिथे त्यांची गती जास्त असते आणि त्याप्रसंगी अरुंद दर्‍या आणि कडबोळ्यांना खोदतात.
पश्चिम घाटातून उगम पावून पूर्वेकडे वाहणार्‍या आणि बंगालच्या उपसागरात मिळणार्‍या इतर लहान नद्याही आहेत. यामध्ये ताम्रपर्णी (अगस्तीमलाई पर्वतांमधून उगम पावत- 128 किमी) आणि वैगाई (वरुषणाड पर्वतांमधून उगम पावते- 250 किमी) यांचा समावेश आहे.

सह्याद्रीच्या पश्चिम बाजूस अनेक लहान, कायमस्वरूपी, अर्धकालीन वेगाने वाहणार्‍या पश्चिमवाहिनी नद्यांची वैशिष्ट्ये आहेत. गुजरातपासून केरळपर्यंत या लहान, वेगवान पश्चिमवाहिनी नद्या तीव्र उतारावरून खाली झेपावत अरबी समुद्रात आपले पाणी सोडतात. किनारपट्टीकडे झेपावताना, या नद्या अनेकदा खोल दर्‍यांमधून जातात, ज्यामुळे नेत्रदीपक धबधबे तयार होतात. काही ठिकाणी 200 मीटरपेक्षा अधिक उंचीवरून पाणी खाली पडते, जेव्हा या नद्या भूवैज्ञानिक faults सामोरे जातात.

यामध्ये बेदती धबधबा (137 मीटर) ज्याला मागोड धबधबा म्हणूनही ओळखले जाते, जोग धबधबा (253 मीटर), chalakkudy धबधबा (56 मीटर) आणि अनैमलाई पलनी एलैमलाई पर्वतरांगेतील 20 ते 300 मीटर उंचीच्या अनेक धबधब्यांचा समावेश आहे.

अरबी समुद्रात मिळणार्‍या पश्चिमेकडील नद्या delta तयार करत नाहीत, तर फक्त खाड्या तयार करतात. जिथे नद्यांचे गोडे पाणी आणि समुद्राचे भरतीचे पाणी मिसळते. वशश्रींर तयार न होण्याचे संंभाव्य कारण असे आहे की या नद्या कठीण खडकांमधून वाहतात आणि म्हणूनच किनार्‍यावर वितरिके (distributaries) तयार करण्यास असमर्थ असतात. या भागातील किनारपट्टी ऐतिहासिक काळात समुद्राच्या दिशेने पुढे जात होती, याचा पुरावा म्हणजे सुरत, जे आता एक अंतर्गत शहर आहे, काही शतकांपूर्वी समुद्रकिनारी एक बंदर होते.

पश्चिमेकडील नद्या इतक्या मोठ्या संख्येने आहेत की त्यांची यादी करणे अशक्य आहे. फक्त केरळमध्येच 44 पश्चिमवाहिनी नद्या आहेत.
पश्चिम घाटाच्या प्रमुख पश्चिमवाहिनी नद्यांची यादी खालीलप्रमाणे आहे : गुजरात : पूर्णा, औरंगा, पार; महाराष्ट्र : सूर्या, वैतरणा, दमणगंगा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, गड, कजवी, कोडवली; गोवा : मांडवी (महादयी), झुआरी, तिराकोल, चापोरा, तळपोणा; कर्नाटक : काली, गंगावली (बेदती), अग्नाशिनी, शरावती, कोल्लूर-चक्र-गंगोळी, सीता, मुल्की, गुरुपूर, नेत्रावती; केरळ : चळियार, भरतपुज्हा, पेरियार, पंबा.

भू-क्षरण, गाळ संचयन आणि नदीय भूआकृतिक स्वरूप
पश्चिम घाटातील नदीदृश्यांमध्ये भू-क्षरण आणि संचयन प्रक्रियेने विविध प्रकारच्या fluvial land forms निर्माण केल्या आहेत. नद्या मुख्यतः हायड्रॉलिक क्रिया (hydraulic action),, घर्षण (abrasion) आणि गंजणामुळे (corrosion) भूमीचा क्षरण करतात. नद्या पश्चिम घाटातून उतरताना खडकाळ भागाचा क्षरण करतात, ज्यामुळे खोल दर्‍या आणि कडबोळे तयार होतात. उदाहरणार्थ, भीमा नदीने खोल दर्‍या खोदल्या आहेत, ज्यामुळे प्राचीन बेसाल्ट खडकांचे स्तर उघड झाले आहेत.

पावसाळ्यात जेव्हा नद्या पाण्याने भरून वाहतात, तेव्हा भू-क्षरण अधिक तीव्र असते. त्यामुळे नदीच्या प्रवाहात वाढ होते आणि गाळाचे वाहून नेणे वाढते. मोठमोठे खडे आणि गाळ खालच्या भागात वाहून नेले जातात. ज्यामुळे समतल भागांमध्ये संचय होतो आणि नदीच्या तटावर alluvial सपाटी तयार होतात.


पश्चिम घाटातील अनेक नद्यांच्या काठावर विकसित झालेले तट आढळतात. नदी तट हे नदीच्या ऊर्जेत आणि गाळाच्या प्रमाणात बदलामुळे तयार होतात, जे समुद्राच्या पातळीत, भूगर्भीय उचल किंवा हवामानातील बदलामुळे होतात. हे तट नदीच्या पूर्वीच्या पातळीचे चिन्ह दर्शवतात आणि भूतकाळातील भूआकृतिक प्रक्रियेचे महत्त्वाचे निदर्शक आहेत.

जलप्रपात आणि कडबोळे (Water falls and Gorges)
पश्चिम घाटातील नदीदृश्यांमध्ये जलप्रपात हे एक महत्त्वाचे भूआकृतिक वैशिष्ट्य आहे, जेथे नद्या कठीण खडकांवरून वाहात असल्याने त्या जलप्रपात तयार करतात. काही प्रमुख उदाहरणांंमध्ये जोग जलप्रपात, अथिराप्पिल्ली जलप्रपात आणि उंचल्ली जलप्रपात यांचा समावेश आहे. हे जलप्रपात पर्यटकांचे आकर्षण आहेत आणि भूआकृतिक प्रक्रियेत भूमिका बजावतात.


कडबोळे म्हणजे खोल आणि अरुंद दर्‍यादेखील पश्चिम घाटात सामान्य आहेत. हे सामान्यतः नद्यांच्या मध्य किंवा उच्च प्रवाहात आढळतात, जिथे पाण्याने लाखो वर्षांपासून खडकाच्या स्तरात खोदकाम केले आहे.

हवामानाचा आणि मानवाचा प्रभाव
पश्चिम घाटात tropical मॉन्सून हवामान आहे, ज्याचा नद्यांच्या भूआकृतिक स्वरूपावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. नैऋत्य मॉन्सून या प्रदेशात जोरदार पाऊस आणतो. काही भागांमध्ये वार्षिक 7000 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. हा तीव्र पाऊस नद्यांना इंधन पुरवतो, ज्यामुळे जलद भू-क्षरण आणि नदीच्या प्रवाहातील वारंवार बदल होतात.

मानवी क्रियाकलाप, जसे की धरणे बांधणे, जंगलतोड आणि कृषी विस्तार, यांनी पश्चिम घाटातील नद्यांच्या भूआकृतिक स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नद्यांच्या प्रवाहात आलेले पश्चिम बदल आणि खनिज उत्खनन यामुळे नदीच्या प्रवाहाचे आकारमान बदलले आहे. पश्चिम घाटातील नदीदृश्ये भूगर्भीय हालचाली, हवामान आणि भू-क्षरणाच्या प्रक्रियेमुळे आकारलेली गुंतागुंतीची प्रणाली आहे. या प्रदेशातील जलप्रपात, तट आणि कडबोळे हे नैसर्गिक इतिहासाचे अद्वितीय दाखले आहेत.

कल्पेश देशपांडे – लेखक/ब्लॉगर

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या