Thursday, November 21, 2024
Homeनगरदिवाळीच्या सुट्टीस आलेल्या मुलाचा बारवेत पडून दुर्दैवी मृत्यू

दिवाळीच्या सुट्टीस आलेल्या मुलाचा बारवेत पडून दुर्दैवी मृत्यू

राहाता |वार्ताहर| Rahata

आजी आजोबांकडे दिवाळीच्या सुट्टीकरिता (Diwali Holiday) आलेल्या 13 वर्षीय नातवाचा राहाता तालुक्यातील (Rahata) गोगलगाव ग्रामपंचायत जवळील बारवेतील पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. दया घुले असे या घटनेत मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने गोगलगावात शोक व्यक्त केला जात आहे. तो संगमनेर (Sangamner) तालुक्यातील खांडगाव (Khandgav) येथून गोगलगाव येथील आपले आजोबा रावसाहेब चिमाजी चौधरी यांचे घरी आला होता. नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशामन पथकानेही त्याला रेस्क्यू ऑपरेशन करून पाण्याबाहेर काढले होते. उपचारार्थ प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या लोणी येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले.

- Advertisement -

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील खांडगाव येथून राहाता (Rahat) तालुक्यातील गोगलगाव येथे आपल्या आजी आजोबांकडे आजोळी दिवाळीचे सुट्टी करिता दया घुले हा 13 वर्षीय मुलगा आला होता. गोगलगाव ग्रामपंचायत जवळील पाण्याच्या बारवेत सकाळच्या दरम्यान पडून त्याचा दुर्दैवी (Death) अंत झाला. पाण्यात पडल्यानंतर नागरिकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास यश आले नाही. ही घटना शालिनीताई विखे पाटील (Shalinitai Vikhe Patil) यांना समजताच त्यांनी तातडीने राहाता (Rahata) येथील नगरपालिका अग्निशमन पथकाचे अशोक साठे यांना सूचना केली.

याबाबत राहाता (Rahata), श्रीरामपूर (Shrirampur) व शिर्डी (Shirdi) येथील अग्निशामन पथकाला माहिती देण्यात आली. अग्निशामन पथक आल्यानंतर दोन तासाने या 13 वर्षीय मुलाला पाण्यातून रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याने तोंडातून व नाकातून पाण्याची गुळणी फेकली असल्याचे बोलले जाते. त्यानंतर लागलीच त्याला लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात उपचारार्थ नेले असता डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले. राहाता (Rahata), श्रीरामपूर (Shrirampur), शिर्डी नगरपरिषदेचे अग्निशामक अधिकारी व पथकाने सुमारे दोन तासानंतर हा मुलगा बारवेच्या पाण्यातून वर काढला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या