Tuesday, May 28, 2024
Homeनाशिकसुखाची चाहूल होऊदे सारे..दुःख ते विसरू दे; आली दिवाळी.. आली दिवाळी..

सुखाची चाहूल होऊदे सारे..दुःख ते विसरू दे; आली दिवाळी.. आली दिवाळी..

नाशिक | प्रतिनिधी

सणांचा राजा व दिव्यांचा सण, सर्वांची आवडती दिवाळी आज पासुन सुरु होणार आहे. तयारी सर्वत्र जल्लोषात झाली आहे. गोवत्स द्वादशीला (गुरुवारी) गाय आणि वासराचे एकत्रित पूजन करुन वसुबारसने दीपावलीला प्रारंभ होणार आहे. घरोघरी आकाश कंदील लागले आहे. आकर्षक द्यिुत रोषणाई करण्यात आली आहे. खमंग फराळाचा सुवास दरळत आहे. बाजारपेठेत खरेदीचाही उत्साह संचारला आहे.आली माझ्या घरी ही दिवाळी हे मंगल गाण्याचे स्वरही घरोघरी कानावर पडु लागले आहेत.

- Advertisement -

वसुबारस गुरुवारी सायंकाळी (दि. ९) साजरी होणार असून यासाठीही पांजरपोळ येथे जय्यत तयारी झाली आहे. वसुबारस ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा होतो. शहरातही गाय वासरांची मोनोभावे पुजा केली जाणार आहे.धनत्रयोदशी तिथी १० नोव्हेंबरला दुपारी १२.३५ ला सुरू होईल आणि दुसर्‍या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १:५७ वाजता समाप्त होईल.

धनत्रयोदशी प्रदोष काळात शुक्रवारी साजरी केली जाईल. नरक चतुर्दशी तिथी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १:५७ वाजता सुरू होईल आणि दुसर्‍या दिवशी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २:४४ वाजता समाप्त होईल. त्यामुळे उदया तिथीनुसार नरक चतुर्दशी १२ नोव्हेंंबरलाच साजरी केली जाणार आहे. लक्ष्मीपूजन आश्विन अमावस्या तिथी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २:४४ वाजता सुरू होईल आणि १३ नोव्हेंबर रोजी दुपारी २:५६ वाजता समाप्त होईल. धनत्रयोदशीप्रमाणेच प्रदोष काळात दिवाळीची पूजा करणे शुभ मानले जाते. त्यामुळे १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपुजन दिवाळी साजरी होणार आहे.

बलीप्रतिपदा मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा साजरा केला जाईल.आणि भाऊबीज बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे.असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव साजरा करण्यासाठी नाशिक नगरी सज्ज झाली आहे. आकाशदिवे, कपडे, पणत्या, इलेक्ट्रिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीतून कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. कामगारांच्या हाती भरघोस बोनस पडल्याने सर्वत्र आनंदी आनंद आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या