Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाजोकोविचने रचला इतिहास, 22व्या ग्रँडस्लॅममध्ये धडाकेबाज कामगिरी

जोकोविचने रचला इतिहास, 22व्या ग्रँडस्लॅममध्ये धडाकेबाज कामगिरी

नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) आपल्या कर्तुत्वाला साजेशी कामगिरी करत खेळ विश्वात इतिहास (sport History) रचला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) २०२३ मधील पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा सामना सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात अतिशय रोमांचाकपणे पार पडला. यामध्ये सर्बियाचा टेनिसपटू (Tennis)नोव्हाक जोकोविच याने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावलत अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

जोकोविचने (Novak Djokovic) अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफानोस त्‍सित्‍सिपासचा पराभव करून आपले १०वे विजेतेपद पटकावले. या सामन्यात जोकोविचने सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६ असा पराभव केला. जोकोविचच्या कारकिर्दीतील हे एकूण २२वे ग्रँडस्लॅम (Grand Slam)आहे.

- Advertisement -

या ग्रँडस्लॅम मध्ये विजेतेपदाच्या लढतीत जोकोविचने शानदार सुरुवात केली आणि पहिला सेट ६-३ आणि दुसरा सेट ७-६ असा जिंकला. आता दुसरा सेट जिंकून जोकोविच हा सामना जिंकेल असे वाटत होते आणि तसेच झाले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा २४ वर्षीय सित्सिपास हा दुसरा सर्वात तरुण पुरुष खेळाडू (player) आहे. त्याआधी जोकोविचने २०११ मध्ये वयाच्या २३व्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती. जोकोविच आणि त्‍सित्‍सिपासमध्‍ये जे जेतेपद पटकावेल तो एटीपी रँकिंगमध्‍ये (rank) प्रथम क्रमांकावर असणार होता, या सामन्यात बाजी मारत अखेर जोकोविचने आपला इतिहास रचला.

- Advertisment -

ताज्या बातम्या