Thursday, September 19, 2024
Homeनगरज्ञानेश्वर सृष्टी, अहिल्यादेवी स्मारकाचा आराखडा तयार - ना. विखे

ज्ञानेश्वर सृष्टी, अहिल्यादेवी स्मारकाचा आराखडा तयार – ना. विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नेवासा येथे उभारण्यात येणार्‍या संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प उभारणीचा आराखडा तयार झाला असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडे या आराखड्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर सृष्टीसाठी 800 तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाचा 350 कोटींचा आराखडा तयार झाला असून या दोन्ही आरखड्यास आज जिल्हास्तरावर अंतिम मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात संत ज्ञानेश्वर सृष्टी विकास आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाबाबत आयोजित आढावा बैठकीनंतर मंत्री विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आदी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्पामध्ये संत ज्ञानेश्वराचा सर्व जीवनपट, लेझर शो आदींचा समावेश करण्यात आला आहे. 800 कोटींमध्ये ज्ञानेश्वर सृष्टीसाठी 400 कोटी तर प्रवरा घाटसाठी 400 कोटी खर्चाचा समावेश करण्यात आला आहे.

शासनाने देखील महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे पाहिले असून अंदाजपत्रकात देखील या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी वारकरी, संत महंताच्या सुचना देखील घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुढच्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील प्रवचनकार व किर्तनकार अशा 700 ते 800 महाराजांची बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीत ज्ञानेश्वर सुष्टीसाठी त्यांच्याकडून सुचना घेण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक देशातील उत्तम स्मारकांपैकी एक असेल असा आराखडा तयार केला असून त्यासाठी 350 कोटी रूपये अपेक्षित आहे. या स्मारकामध्ये 100 फूट अहिल्यादेवीचा पुतळा उभारण्यात येणार असून त्यातही अहिल्यादेवीचा जीवनपट राहणार आहे. हे स्मारक पुणे रस्त्यावरील चास गावाजवळील कृषी विभागाच्या 16 एकर जागेत उभारण्यात येणार आहे. आज बैठकीत दोन्ही प्रकल्पांच्या आराखड्यास जिल्हास्तरावर अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. आता लवकरच मुख्यमंत्र्यांना सादीकरण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाणार असल्याचे मंत्री विखे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात उद्योग वाढीबरोबर बेजगारासाठी ऑक्टोबरमध्ये नगर शहरात उद्योग परिषद घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने उद्योजकांना आमंत्रित करण्यात आले आहे. शासनाच्या सर्वच महत्वपूर्ण योजनांमध्ये नगर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण, वयोश्री, बळीराजा, अन्नपूर्णा अशा सर्वच योजना प्रभावीपणे राबविण्यात नगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, नगर- मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीसाठी 9 कोटी निधी पूर्वीच आला होता. त्याबाबत खा. नीलेश लंके दावा करीत असले आणि श्रेय घेत असतील तरी काही फरक पडणार नाही. शेवटी कामे होणे महत्वाचे आहे. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. या पूर्वीच्या दोन्ही ठेकेदारांनी फसविले. मात्र आता निविदा काढून कामाला सुरू होणार आहे, असे मंत्री विखे म्हणाले.

विरोधकांकडून अफवा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना बोलण्यासाठी काहीच राहिले नाही. सर्व योजना चांगल्या पध्दतीने सुरू असून कोठेही निधीची कमी नाही. कोणत्याही योजना अडचणीत नाहीत. योजना अडचणीत असल्याचा अफवा विरोधकांनी पसरविल्या आहेत, असे मंत्री विखे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या