Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमAhilyanagar : जिल्ह्यातील 1200 हून अधिक गुंतवणूकदारांची तक्रार

Ahilyanagar : जिल्ह्यातील 1200 हून अधिक गुंतवणूकदारांची तक्रार

ज्ञानराधा मल्टिस्टेट फसवणूक प्रकरण || आर्थिक गुन्हे शाखेने जबाब नोंदविले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि जामखेड पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील 1200 पेक्षा अधिक गुंतवणूकदारांचे या संदर्भात तक्रारी घेत जबाब नोंदविले आहे.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणामुळे अनेक गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, मजूर, व्यापारी आणि नोकरदारांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. तक्रारदार आपल्याकडील गुंतवणूक पावत्या, आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी करत आहेत. ज्ञानराधा मल्टिस्टेट फसवणूक प्रकरणात राज्यभरात एकूण 98 गुन्हे दाखल झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर आणि जामखेड पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चालू आहे. श्रीरामपूरमधील गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू असून, जामखेडमधील गुन्ह्यातील ‘मनी ट्रेल’ म्हणजेच आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यात आला आहे. या तपासातून फसवणुकीचा एकूण आकडा 77 कोटी रूपयांच्या घरात असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

YouTube video player

पोलिसांनी याआधी जाहीर आवाहन करून गुंतवणूकदारांना तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जामखेड गुन्ह्याशी संबंधित राहुरी, जामखेड व खर्डा शाखेत गुंतवणूक केलेल्या 958 गुंतवणूकदारांनी आपली तक्रार दाखल केली आहे. या सर्वांकडून तक्रार अर्ज, पावत्या व इतर कागदपत्रे गोळा करून जबाब नोंदविण्यात आले असून, त्यामध्ये एकूण 45 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सुध्दा आतापर्यंत 250 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात एकूण फसवणुकीचा आकडा 42 कोटी रूपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजूनही काही गुंतवणूकदार आर्थिक गुन्हे शाखेत येऊन आपली कागदपत्रे सादर करत आहेत. श्रीरामपूर प्रकरणाचा फा0ॅरेन्सिक ऑडिट अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक तपशील पोलिसांना मिळणार आहे.

कायदेशीर मदतीच्या नावाखाली वसुली
या संपूर्ण गोंधळात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली काही कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तींनी गैरफायदा घेण्यास सुरूवात केली आहे. काही लोकांनी न्यायालयीन लढ्यासाठी मदत करण्याचे सांगून गुंतवणूकदारांकडून त्यांच्या गुंतवणूकीच्या रकमेवर 2 ते 3 टक्के रक्कम वसूल केली आहे. असे वसूली करणारे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रिया व पोलीस तपासाविषयी खोटी माहिती गुंतवणूकदारांना देत असून, त्यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार केला आहे. श्रीरामपूर शहरातील एका कार्यालयात कायदेशीर लढाईसाठी फी वसूली सुरू असून पोलिसांकडे जबाब नोंदविण्यासाठी आलेल्या काही गुंतवणूकदारांनी याबाबतची माहिती दिली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...