Monday, November 25, 2024
Homeभविष्यवेधसोन्याचे दागिने पायात घालत नाहीत

सोन्याचे दागिने पायात घालत नाहीत

फक्त महिलाच नाही तर, लहान मुलींना देखील दागिने घालण्यासाठी मोठी उत्सुकता असते. कोणताही सण किंवा कार्यक्रम असेल तर प्रत्येक स्त्री दागिन्यांमध्ये सजते. भारतीय संस्कृतीत दागिन्याला एक महत्त्वाचं स्थान आहे. महिलाचं नाही तर पुरुष देखील दागिने घालतात . विशेषतः महिलांना सोन्याचे दागिने फार आवडतात. पण तुम्ही महिलांना कधी पायता दागिने घालताना पाहिलं आहे? शक्यतो कधी नसेल पाहिलं. तर आज जाणून घेऊ पायात दागिने का नाही घालत.

सनातन धर्मानुसार कमरेच्या खाली सोन्याचे दागिने घालणं वर्ज्य मानलं जातं. ते फक्त कंबरेच्या वरच्या भागात घातले जाऊ शकतात. याची एक नाही तर दोन कारणं आहेत. पायात सोने न घालण्याचे पहिले कारण वैज्ञानिक आहे.

- Advertisement -

पायात सोनं न घालण्याचं वैज्ञानिक कारण –

माणसाची शारीरिक रचना अशी आहे की त्याच्या शरीराच्या वरच्या भागाला थंडपणा आणि खालच्या भागाला फक्त उबदारपणाची गरज असते. सोन्याचे दागिने घातल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते.

त्यामुळे सोन्याचे दागिने पायात घातल्याने तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते. अशा स्थितीत पायात सोन्याऐवजी चांदीचे दागिने घातले जातात, जेणेकरून शरीराचे तापमान संतुलित राहील.

पायात सोनं न घालण्याचं दुसरं कारण

अशी मान्यता आहे की, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना सोनं प्रचंड प्रिय आहे. त्यामुळे नाभीच्या खाली म्हणजेच कंबरेपर्यंत ते घालण्यास मनाई आहे. जर तुम्ही पायात सोन्याचे दागिने घालत असाल, तर तो विष्णू आणि लक्ष्मीचा अपमान मानला जातो. यामुळे तुमच्या घरातील सुख, शांती, ऐश्वर्य आणि समृद्धी दोन्ही नाहीशी होते… असा समज आहे.

पायात घातल्याने सोन्यावर धूळ चढते – पायात सोन्याचे दागिने न घालण्याचे एक कारण म्हणजे धूळ आणि मातीमुळे ते खराब होऊ शकतात. ज्यामुळे दागिन्याची चमक कमी होऊ शकते. कंबरेच्या वर म्हणजे मानेवर, नाकात, गळ्यात दागिने खराब होण्याचा धोका नसतो.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या