Sunday, May 26, 2024
Homeमनोरंजनबॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांचे बॉडीगार्ड (Bodyguard)असलेले जितेंद्र शिंदे नुकतेच त्यांना मिळत असलेल्या पगारामुळे (salary)चर्चेत आले. परंतु जितेंद्र शिंदेच नाही तर बॉलीवूडमधील स्टारकडे कार्यरत असलेल्या बॉडीगार्डचा पगार ऐकून थक्कच व्हाल. बॉडीगार्डने कोटीच्या कोटी उड्डाने केली आहे.

बॉलिवूडचा सुलतान म्हणजेच अभिनेता सलमान खानच्या (salman khan)बॉडीगार्ड शेराला कोण नाही ओळखत. सलमान खानचा बॉडीगार्ड त्याच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे. शेरा गेल्या कित्येक वर्षांपासून सलमानचा बॉडीगार्ड आहे. सलमान खान आपल्या बॉडीगार्ड शेराला दरवर्षी २ कोटी पगार देतो.

- Advertisement -

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे अभिनेता आमिर खानच्या (amir khan)बॉडीगार्डचे नाव युवराज घोरपडे (Yuvraj Ghorpade)आहे. आमिर खान आपल्या बॉडीगार्डकडे खूप लक्ष ठेवतो. युवराजला आमिर वर्षाला अडीच कोटी रुपये पगार देत असल्याचे वृत्त आहे.

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अभिनेता अक्षय कुमारच्या (akshay kumar) बॉडीगार्डचे नाव श्रेयस थेले (Shreysay Thele)आहे. अक्षय कुमार आपल्या बॉडीगार्डला वर्षाला २ कोटी रुपये पगार देतो. २४ तास श्रेयस थेले अक्षय कुमारकडे कार्यरत असतो.

बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या (deepika padukone)बॉडीगार्डचे नाव जलाल आहे. दीपिका देखील आपल्या बॉडीगार्डला मोठा पगार देते. दीपिका आपल्या बॉडीगार्डला राखी देखील बांधते. दीपिका जलालला दीड कोटी रुपये पगार देते.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खानच्या (shahrukh khan) बॉडीगार्डचे नाव रवी सिंह आहे. शाहरुख खान जिथे जिथे जातो त्या ठिकाणी त्याचा बॉडीगार्ड रवी सिंह त्याच्यासोबत असतोच. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान रवी सिंहला वर्षाला २.५ कोटी रुपये पगार देतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या