घरात उंदरांचे येणे ही नवीन गोष्ट नाही. असे अनेकदा घडते की उंदीर आपल्या घरात घुसतात आणि धुमाकूळ घालतात. कधीकधी तर उंदीर खूप नुकसान करतात. महागड्या वस्तू खराब करतात. पण याबद्दल शकुन शास्त्र काय सांगते हे तुम्हाला माहीत आहे का?
शकुन शास्त्रानुसार उंदरांचा घरात प्रवेश करणे शुभ की अशुभ, जाणून घेऊया.
उंदीर ही गणपतीची स्वारी मानली जाते. म्हणूनच ते धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जातात. काही मंदिरांमध्ये उंदरांची नियमित पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य पण दाखवला जातो. पण घरात उंदीर येणे हे चांगले लक्षण आहे का? घरात उंदीर येण्याबद्दल शकुन शास्त्र काय सांगते, चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर…
उंदरांनी घरात बिळ बनवले तर – उंदीर हे गणपतीचे वाहन मानले जात असले तरी ते जर तुमच्या घरात शिरले आणि बिळात राहू लागले तर ते तुमच्या भविष्यासाठी खूप अशुभ लक्षण आहे. असे मानले जाते की, तुमचे शत्रू सक्रिय झाले आहेत आणि ते तुमच्या विरोधात मोठे कट रचू शकतात. अशा स्थितीत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेतली पाहिजे.
उंदरांची संख्या वाढली तर – जर अचानक तुमच्या घरात उंदरांची संख्या वाढू लागली आणि घरात फिरताना तुम्हाला उंदीर दिसायला लागले तर समजा लवकरच मोठे नुकसान होणार आहे. असे मानले जाते की, घरात उंदीर वारंवार दिसणे हे गरिबीचे लक्षण आहे. जर उंदीर कुरतडत असतील तर समजा लवकरच तुम्हाला काही वाईट बातमी ऐकायला मिळू शकते. अशा स्थितीत प्रत्येक काम काळजीपूर्वक करावे.
चिचुंद्री दिसल्यास – जर तुमच्या घरात चिचुंद्री दिसल्यास ते धनाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. चिचुंद्री दिसायला उंदरासारखीच असते, पण आकाराने ती थोडी लांब असते. घरात असे उंदीर दिसणे चांगले मानले जाते. जर तुम्हाला घरात चिंचुंद्री दिसली तर तुम्हाला लवकरच पैसे मिळतील आणि लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल