Monday, May 27, 2024
Homeनाशिकबेळगाव कुऱ्हे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर; कारवाई करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आश्वासन

बेळगाव कुऱ्हे आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर; कारवाई करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आश्वासन

वाडीवऱ्हे | वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने दवाखान्याचा कारभार रामभरोसे झाला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.बी.देशमुख यांच्याकडे छावा क्रांतिवीर सेनेचे तालुकाध्यक्ष गोकूळ धोंगडे यांनी तक्रार करताच डॉ. देशमुखांनी बेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र गाठत सत्यपरिस्थितीचा आढावा घेतला. तसेच येथे आलेल्या रुग्णांशी त्यांनी वार्तालाप करून डॉक्टरांविषयी कैफियत जाणून घेतली. त्यानंतर डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

- Advertisement -

वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबंळे हे गेल्या महिन्याभरापासून रजेवर असुन त्यांच्या जागेवर डॉक्टर सुषमा शिंदे यांना प्रभार देण्यात आला आहे. परंतु दवाखान्यात त्या आलेल्या नव्हत्या. सकाळी नऊ वाजता दवाखान्यात हजर राहणे बंधनकारक असतानाही डॉ. शिंदे या तब्बल दुपारी १.३० वाजता दवाखान्यात आल्या.

वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात वेळेवर येत नसल्याने रुग्णांचे हाल होत असुन बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनीही दवाखान्यात वेळेवर येऊन रुग्णांना सेवा देने गरजेचे असतांना यावर संपूर्ण दुर्लक्ष करून आरोग्य यंत्रणा रुग्णांच्या जीवाशी खेळत असुन दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करून दवाखान्याच्या कामात सुसुत्रता आणावी अशी मागणी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. अन्यथा दवाखान्याला टाळे ठोकू असा इशाराही दिला.

यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एम .बी.देशमुख यांनी दवाखान्यात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी डॉक्टरांची अनुपस्थिती दिसून आली. तसेच रुग्णांशी त्यांनी संवाद साधल्यानंतर रुग्णांनी डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे प्रचंड नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर दोषी डॉक्टरांवर व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन डॉ. देशमुख यांनी दिले.

बेलगाव कुर्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर येत नसल्याने कार्यक्षेत्रातील गावच्या रुग्णांना याचा मोठा त्रास होता. आम्ही वारंवार मागणी करूनही डॉक्टर व कर्मचारी दखल घेत नसल्याने शेवटी आज तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.बी.देशमुख यांना दुरध्वनीवरून सदर महिती देताच ते स्वतः बेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आले व परिस्थिती जाणुन घेतली व दोषींवरी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

– गोकुळ धोंगडे, अध्यक्ष इगतपुरी तालुका छावा क्रांतिवीर सेना

- Advertisment -

ताज्या बातम्या