Tuesday, March 25, 2025
Homeमनोरंजनचित्रपटात डॉक्टरांच्या साकारलेल्या 'या' भूमिका नेहमीच स्मरणात राहतील..

चित्रपटात डॉक्टरांच्या साकारलेल्या ‘या’ भूमिका नेहमीच स्मरणात राहतील..

हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता संजय दत्त याने मुन्नाभाई एम. बी. बी. एस या चित्रपटात डॉक्टर ची भूमिका साकारली होती. यातील ‘जादू की झप्पी’ या उपचाराच्या वेगळ्या पद्धतीमुळे चित्रपट हिट झाला होता. संजय दत्त या डॉक्टरच्या भूमिकेमुळे चर्चेत आला होता.

कारकीर्दीतील सर्व ऑपरेशनमध्ये यशस्वी झालेल्या आणि बर्‍याच शस्त्रक्रिया केलेल्या डॉ. राम प्रसाद घायल यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी मृत्यूदाता या चित्रपटात साकारली होती. त्या काळात हा चित्रपट खूप गाजला होता.

- Advertisement -

करीना कपूरने कारकिर्दीत अनेक चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारली आहे. तिचे अनेक चित्रपट गाजले. यामध्ये सलमान खान सोबत “क्योंकि”, शाहिद कपूरच्या “उड़ता पंजाब” तसेच अमीर खानच्या “थ्री इडियट” या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला होता.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या कबीर सिंग या चित्रपटामुळे शहीद कपूर याने हिंदी चित्रपट जगतात नवीन ओळख निर्माण केली. या चित्रपटात शाहिद कपूर याने एक वेडा प्रेमी, त्यानंतर मेडिकल कॉलेज मधील सर्वात हुशार व्यक्ती आणि त्यानंतर एक मोठा सर्जन अशी भूमिका साकारली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये (Accident) पती-पत्नी जागीच ठार (Killed)...