Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजडोंबिवली दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आणखी ३ मृतदेह सापडले

डोंबिवली दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आणखी ३ मृतदेह सापडले

डोंबिवली | Dombivali
डोंबिवलीमध्ये काल एमआयडीसीत फेज २ मध्ये कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली होती. ज्यानंतर या परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये भीषण अग्नितांडव बघायला मिळाले असून बहुतांश कंपन्याचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेनंतर कंपनीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाकडून शर्थीते प्रयत्न सुरु आहे. या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढला असून बचाव कार्यादरम्यान पथकाला आणखी ३ मृतदेह सापडले आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ११ वर गेली आहे. तर ६० हुन अधिक जण जखमी झाले आहे.

एनडीआरएफ पथकाकडून शुक्रवारी सकाळापासून पुन्हा शोधमोहिम सुरू करण्यात आली. घटनास्थळी पाच ते सहा गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू झाले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचे मृतदेह हाती लागले आहे. गुरवारी रात्रीपर्यंत हा आकडा ८ होता मात्र आज सकाळपासून आणखी तीन मृतदेह शोधमोहिमेदरम्यान काढण्यात आले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेत आणखी काही जण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

- Advertisement -

या सगळ्या घटनेत आणखी मोठी अपडेट समोर आली असून सदर कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता आता कारवाईला वेग मिळाला असून, या भागामध्ये अद्यापही बचावकार्य सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.

एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोटानंतर लागलेल्या भयंकर आगीने डोंबिवली परिसर हादरुन गेला आहे. काल दुपारी दोन वाजता डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत भीषण स्फोट झाला. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की परिसरातील २ ते ३ किमीपर्यंतच्या इमारतींच्या काचा फुटल्या तसेच हादरेही बसले. कालपासून या दुर्घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल तसेच एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या