Tuesday, May 21, 2024
Homeदेश विदेशमहागाईचा भडका! घरगुती LPG सिलिंडरचे भाव पुन्हा वाढले... जाणून घ्या नवे दर

महागाईचा भडका! घरगुती LPG सिलिंडरचे भाव पुन्हा वाढले… जाणून घ्या नवे दर

दिल्ली | Delhi

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांची होरपळ सुरू असून पेट्रोल-डिझेलसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. आता पुन्हा महागाईचा तडाखा बसला आहे.

- Advertisement -

आज एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यासोबतच आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही ९९९.५० रुपयांना गॅस मिळणार आहे.

दरम्यान याआधी २२ मार्च रोजी घरगुती घरगुती सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ९४९.५० रुपयांवर पोहोचली होती. आता पुन्हा एकदा महागाईने जनतेला मोठा झटका दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या