Sunday, September 15, 2024
HomeमनोरंजनDon 3 : 'मैं डॉन हूँ...'! डॉन-3 चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, रणवीर...

Don 3 : ‘मैं डॉन हूँ…’! डॉन-3 चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत

मुंबई | Mumbai

- Advertisement -

बॉलिवूडच्या इतिहासातील ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक म्हणजे ‘डॉन’. 1987 साली पहिल्यांदा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘डॉन’ पडद्यावर साकारला. यानंतर २००६ मध्ये शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) रुपात हे कॅरेक्टर पुन्हा जीवंत झाले. शाहरुखने ‘डॉन’ आणि ‘डॉन 2’ या सुपरहिट सिनेमातून जलवा दाखवला. आता दिग्दर्शक फरहान अख्तरने (Farhan Akhtar) ‘डॉन 3’ची घोषणा केली आहे. तसंच यावेळी शाहरुख नाही तर रणवीर सिंह ‘डॉन’ असणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या टीझरमध्ये रणवीर सिंहचा (Ranveer Singh) फर्स्ट लुक समोर आला आहे.

एक मिनिट ४८ सेकंदाच्या या टीझरमध्ये रणवीर सिंगचा जबरदस्त लूक आणि डायलॉग्स प्रेक्षकांना आवडतोय. त्याने त्याच्या लूकवर चांगलेच काम केलं आहे. या टिझरमध्ये रणवीर सिंग त्याच्या डॅशिंग लुकमध्ये डायलॉग्स बोलताना दिसत आहे. एका उंच इमारतीत बसलेला रणवीर सिंग त्याच्या अंदाजात डायलॉग्स म्हणतोय. अन् शेवटी तो बोलतो, ’11 मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे, पर पकड़ पाया है मुझको कौन? मैं हूं डॉन.’ या टीझरखालील कॉमेंटमध्ये बऱ्याच लोकांनी रणवीरची खिल्ली उडवली आहे. तसेच शाहरुख नसेल तर डॉन ३ पाहणार नाही असंही काही नेटकऱ्यांनी कॉमेंट करत लिहिलं आहे. एकूणच जे प्रेक्षक शाहरुखच्या ‘डॉन ३’ची आतुरतेने वाट पहात होते त्यांचा हा टीझर पाहून हिरमोड झाला आहे. अद्याप चित्रपटाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. ‘डॉन ३’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द फरहान अख्तर याचं दिग्दर्शन करणार आहे.

‘बाजीराव मस्ती’ असो किंवा ‘बेफिक्रे’, रणवीर सिंगने प्रत्येक वेळी आपल्या भूमिका उत्तमप्रकारे साकारल्या आहेत. भयानक भूमिका असो किंवा खोडकर… त्याच्या भुमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकतो. ‘डॉन 3’ मधील त्याच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तो ज्या प्रकारे जॅकेट घालतो किंवा लाइटर लावतो त्याची स्टाईल प्रेक्षकांना आवडली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या