Saturday, October 17, 2026
Homeदेश विदेशभारतावर १००% अतिरिक्त टॅरिफचे संकट तूर्त टळले! ट्रम्प यांचा रशियन कच्चा तेलाबाबत...

भारतावर १००% अतिरिक्त टॅरिफचे संकट तूर्त टळले! ट्रम्प यांचा रशियन कच्चा तेलाबाबत मोठा निर्णय

नवी दिल्ली | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी रशियाविरुद्धचे अनेक निर्बंध, अटी आणि सीमाशुल्क (ड्युटीज) तूर्तास शिथिल केले आहेत. युक्रेनवरील आक्रमणावरून मॉस्कोवर दबाव वाढवण्यासाठी लागू केलेल्या कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच त्यांनी हे पाऊल उचलले. ट्रम्प यांनी तात्पुरती सुट दिल्याने भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या भारतासारख्या देशांवर १००% पर्यंत अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची तरतूद असलेल्या अमेरिकेच्या नव्या कायद्याची अंमलबजावणी ट्रम्प यांनी तूर्त शिथिल केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेश जारी करुन कायद्यातील सूट देण्याच्या तरतुदीचा वापर केल्याचे म्हटले आहे. अमेरिकन काँग्रेससमोर निर्बंध आणि टॅरिफ संदर्भातील कारवाईतून सूट देणे अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचं असल्याचं पटवून दिल्याचे ट्रम्प म्हंटले आहे.

- Advertisement -

हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा भारत आणि चीनसारखे रशियन तेलाचे मोठे खरेदीदार अमेरिकेच्या संभाव्य दंडात्मक शुल्काबाबत चिंता व्यक्त करत होते. नव्या कायद्यातील तरतुदी लागू झाल्यास भारतावर अतिरिक्त शुल्काचा धोका निर्माण होऊ शकत होता. आता त्या तरतुदींना दिलेल्या सवलतीमुळे भारताला रशियाकडून ऊर्जा खरेदी करताना अमेरिकेच्या या नव्या कायद्यांतर्गत होणाऱ्या संभाव्य कारवाईपासून तूर्त दिलासा मिळू शकतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १६ ऑक्टोबर रोजी लिंडसे ओ ग्राम सँक्शनिंग रशिया अँड इराण अॅक्ट ऑफ 2026 च्या अंतर्गत कार्यकारी आदेश जारी केला. या कायद्याचा उद्देश युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाबद्दल मॉस्कोवर आर्थिक दबाव वाढवणे हा आहे. मात्र, नव्या कायद्यातील काही कठोर तरतुदी लागू करण्याऐवजी ट्रम्प यांनी त्यांना राष्ट्रीय हिताच्या कारणास्तव सूट दिली.

संपादकीय : १७ ऑक्टोबर २०२६ – विकासाचा वेग अन् महागाईचा आगडोंब

भारताला १०० टक्के टॅरिफपासून मिळणार मोठा दिलासा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या या आदेशानुसार नव्या कायद्यांतर्गत रशियन तेलाची खरेदी करणाऱ्या देशांवर लावण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्कामधून सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे भारताला सध्या दिलासा मिळणार आहे. कारण भारत रशियाकडून येणाऱ्या कच्चा तेलाच्या मोठ्या खरेदीदारांपैकी एक आहे. मात्र ट्रम्प यांच्या घोषणेमधून भारतासाठी स्वतंत्र सवलत देण्यात आलेली नाही. तर या कायद्याशी संबंधित टॅरिफमधून दिल्या गेलेल्या व्यापक सवलतीचा भारताला फायदा होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह एकूण पाच देशांना रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करण्यासाठी लादण्यात आलेल्या टॅरिफमधून सवतल देण्याची घोषणाही केली आहे.

ट्रम्प यांच्या घोषणेतील महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि इराणवर निर्बंधांशी संबंधित नव्या कायद्यातील काही महत्त्वाच्या तरतुदींवर सध्या सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. १६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशांनुसार हे निर्बंध, बंदी आणि शुल्कामधून सवलत देणं अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचं आहे. यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेला एक लिखित प्रमाणपत्रही सादर केले आहे. या आदेशांनुसार कायद्यातील अनेक निर्बंधांसह रशियाशी संबंधित काही अतिरिक्त शुल्कही सध्या लागू न करण्याबाबत सवलत देण्यात आली आहे. ही सवलत पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : शहर पाेलीस सज्ज; हॉटेल, भाडेकरूंनंतर आता जुने वाहन...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Simhstha Kumbhmela) आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणारा देशाच्या राष्ट्रपतींचा नाशिक दौरा या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...