Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशDonald Trump: "मला वाटते की ५ विमाने पाडली असतील, पण कोणाची?; भारत-पाकिस्तान...

Donald Trump: “मला वाटते की ५ विमाने पाडली असतील, पण कोणाची?; भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्पच्या नव्या दाव्याने खळबळ

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर दिले होते. या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात पाच विमाने पाडण्यात आली होती, असा दावा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ‘व्यापार करारामुळे हा तणाव कमी झाला आहे, दोन्ही देशांमधील परिस्थिती गंभीर होती. अण्वस्त्रांनी सज्ज असलेले देश एकमेकांविरुद्ध कारवाई करत होते. विमानांना लक्ष्य केले जात होते. मला वाटते की ५ विमाने पाडली असतील’,असा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, विमानांवर हवेतून गोळीबार करण्यात येत होता. पाच, पाच, चार किंवा पाच, परंतु मला वाटते की प्रत्यक्षात पाच विमाने पाडण्यात आली होती, असे ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबद्दल बोलताना सांगितले, परंतु ही विमाने भारताचीच होती की पाकिस्तानची होती हे स्पष्ट सांगितले नाही. दुसरीकडे, पाकिस्ताननेही हवाई हल्ल्यात पाच भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला होता. भारताचे सीडीएस अनिल चौहान यांनी मे महिन्याच्या अखेरीस सांगितले होते की युद्धाच्या पहिल्या दिवशी हवेत नुकसान सहन केल्यानंतर भारताने रणनीती बदलली आणि तीन दिवसांनी युद्धबंदी जाहीर होण्यापूर्वी फायदा निर्माण केला. भारताने असाही दावा केला की, त्यांनी पाकिस्तानची “काही विमाने” पाडली. भारतानेही पाकिस्तानची काही विमानं पाडल्याचा दावा केला होता. इस्लामाबादने कोणत्याही विमानांचे नुकसान झाल्याचे नाकारले मात्र त्यांच्या हवाई तळांचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले.

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प यांनी १० मे २०२५ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युध्दबंदी झाल्याचे त्यांच्या एक्स हँडलवरून जाहीर केले होते. त्याचदिवशी संध्याकाळी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. आपण व्यापार थांबवण्याची धमकी दिल्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी तर युएई आणि अरब देशांच्या मध्यस्थीने तणाव निवाळल्याचे म्हटले होते. पण आता ट्रम्प यांनी पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आपल्यामुळेच निवळल्याचा दावा केला आहे.

YouTube video player

नवी दिल्ली आणि इस्लामाबादने त्यांच्यातील समस्या थेट आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय सोडवल्या पाहिजेत अशी भारताची भूमिका आहे. आशियातील चीनच्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी वॉशिंग्टनच्या प्रयत्नांमध्ये भारत हा अमेरिकेचा वाढता महत्त्वाचा भागीदार आहे, तर पाकिस्तान हा अमेरिकेचा मित्र आहे. पहलगाममध्ये एप्रिलमध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जण ठार झाले आणि दशकांपासून सुरू असलेल्या शत्रुत्वाच्या नवीन वाढीमध्ये अण्वस्त्रधारी आशियाई शेजारी देशांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला होता. नवी दिल्लीने हल्ल्याचा आरोप पाकिस्तानवर केला, ज्याने जबाबदारी नाकारली आणि तटस्थ चौकशीची मागणी केली.

यापूर्वीही ट्रम्प यांनी दावा केला होता
ट्रम्प यांनी यापूर्वीही याबाबत दावा केला होता. “भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष व्यापाराच्या माध्यमातून थांबवला आहे, जो अणुयुद्धात बदलू शकला असता, असंही ट्रम्प म्हणाले. ओव्हल ऑफिसमध्ये नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांच्याशी झालेल्या बैठकीत ट्रम्प म्हणाले, ‘युद्धांदरम्यान उपाय शोधण्यात आपण खूप यशस्वी झालो आहोत. भारत आणि पाकिस्तानचे उदाहरण तुमच्यासमोर आहे. रवांडा आणि काँगो युद्ध आहे जे ३० वर्षांपासून चालू होते.’ भारत आणि पाकिस्तान ज्या पद्धतीने पुढे जात होते, त्यामुळे पुढील आठवड्यात त्यांच्यात अणुयुद्ध झाले असते. परिस्थिती खूप वेगाने बिकट होत चालली होती आणि आम्ही हे व्यापाराच्या माध्यमातून केले. मी म्हणालो होतो की जोपर्यंत तुम्ही हा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याशी व्यापाराबद्दल बोलणार नाही आणि त्यांनी तसे केले’,असेही ट्रम्प म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...