Friday, July 10, 2026
Homeदेश विदेशइराणसोबतचा सामंजस्याचा काळ संपला! डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दोन्ही देशांदरम्यान पुन्हा युद्धाचा...

इराणसोबतचा सामंजस्याचा काळ संपला! डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दोन्ही देशांदरम्यान पुन्हा युद्धाचा भडका उडणार?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराण सोबत करण्यात आलेला शांतता करार संपुष्टात आल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मला इराण सोबत कोणताही करार करायचा नाही. आता शांतता चर्चेचा काळ संपलेला आहे, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. यानंतर जागतिक पातळीवर हलकल्लोळ उडाला आहे. तुर्कीची राजधानी अंकारा येथे आयोजित नाटो शिखर परिषदेदरम्यान पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्याच महिन्यात शांतता करारावर चर्चा झाली होती. त्यावेळी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी युद्ध कायम स्वरुपी संपवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. पण गेल्या एक ते दोन दिवसांत होर्मुझच्या सामुद्रधुनीत ३ जहाजांवर हल्ले झाले. त्यामुळे तणाव वाढला. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबत कोणताही करार न करण्याची भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

माध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला लक्ष्य केले. ‘ते आजारी मानसिकतेचे लोक आहेत. मला त्यांच्याशी कोणताही करार करायचा नाही. त्यांनी आपल्याच देशातील ५४,००० निदर्शकांची हत्या केली आहे.” इराणसोबतच्या सामंजस्याचा काळ आता संपलेला आहे, असे मला वाटते,’ असे ट्रम्प म्हणाले. याचवेळी ट्रम्प यांनी नाटो, ग्रीनलँड आणि स्पेनवरही तिखट शब्दांत भाष्य केले. इराण सोबत कोणताही नवा करार करायची माझी इच्छा नाही. हा मुद्दा आता संपलाय, असे मला वाटते, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांच्या या वक्तव्याच्या काही तास आधीच अमेरिकेने इराणवर मोठी लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणच्या ८० पेक्षा जास्त लष्करी तळांवर अचूक आणि अत्यंत शक्तिशाली हवाई हल्ले केले आहेत.

अमेरिकेच्या या भीषण हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या ८५ लष्करी तळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा संयुक्त मारा केला.

Trimbakeshwar Rain Update : त्र्यंबकेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस; कुठे दरड कोसळली, तर कुठे रस्ता गेला वाहून, काही गावांचा संपर्कही तुटला

इराणवर अमेरिकेकडून करण्यात आलेल्या ताज्या हल्ल्यांवरही डोनाल्ड ट्रम्प सविस्तर बोलले. ‘काल रात्री इराणच्या अतिशय धोकादायक लोकांवर आम्ही जबरदस्त हल्ले केले. आम्ही त्यांना म्हटलं, जा अंत्यविधीची कामं करा. पण त्याऐवजी त्यांनी जहाजांवरुन रॉकेट डागण्यास सुरुवात केली. त्यामुळे आम्ही काल रात्री त्यांच्यावर जोरदार हल्ले केले,’ असं ट्रम्प यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

पडसाद : त्र्यंबकची माळीण होऊ द्यायची नसेल तर…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूचा परिसर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा सामना करीत आहे. अलीकडेच आलेल्या...