Thursday, August 20, 2026
Homeदेश विदेशDonald Trump: डोनाल्ड ट्रम्पकडून भारताच्या निवडणुक प्रक्रियेचे तोंडभरून कौतूक, म्हणाले, भारताकडून...

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्पकडून भारताच्या निवडणुक प्रक्रियेचे तोंडभरून कौतूक, म्हणाले, भारताकडून…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेत मतदानाचे नियम अधिक कठोर करण्यासंदर्भात आणि ‘सेव्ह अमेरिका ॲक्ट’ लागू करण्यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, त्यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेचा आणि मतदार ओळखपत्राच्या व्यवस्थेचा उल्लेख करत भारतीय निवडणूक व्यवस्थेचे कौतुक केले आहे. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदार ओळखपत्राची सक्ती असावी, या आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ ट्रम्प यांनी भारताचे उदाहरण दिले. भारतात मोठ्या संख्येने मतदान होत असूनही मतदारांची ओळख पटविण्यासाठी फोटो ओळखपत्राचा वापर केला जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथसोशलवर पोस्ट
या महिन्याच्या सुरुवातीला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आमच्या म्हणजेच अमेरिकेच्या प्रशासनाला विचारले होते की अमेरिकेत तुम्ही मतदारांना फोटो असलेली ओळखपत्रं का दिलेली नाहीत? त्याशिवाय तुम्ही निवडणुका कशा काय घेता? भारतात २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ६४ कोटी ६० लाख लोकांहून अधिक मतदारांनी मतदान केले. प्रत्येक मतदाराकडे त्यांच निवडणूक ओळखपत्र होतं कारण ते असणं अनिवार्य आहे. आता या पार्श्वभूमीवर अमेरिकाही पावलं उचलणार आहे आम्ही लवकरच या संबंधातला कायदा मंजूर करु असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमधून सेव्ह अमेरिका ॲक्ट पास करण्याचीही घोषणा केली आहे.

- Advertisement -

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात वाढ; कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार, नवा अधिनियम जारी

सर्जिओ गोर यांचा विधानाला दुजोरा
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनीही ट्रम्प यांच्या या मताचे अथवा विधानाचे समर्थन केले आहे. ट्रम्प यांचे विधान अगदी योग्य असून भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात प्रत्येक मतदारासाठी ओळखपत्र अनिवार्य आहे, यामुळे अमेरिकन काँग्रेसने ‘सेव्ह अमेरिका ॲक्ट’ लवकरात लवकर संमत करायला हवा,” असे गोर यांनी म्हटले आहे.

काय आहे सेव्ह अमेरिका ॲक्ट
व्हाईट हाऊसच्या मते, सेव्ह अमेरिका ऍक्ट या कायद्याचा उद्देश संघीय निवडणुकीच्या निर्णयांमध्ये फक्त अमेरिकन नागरिकांचाच सहभाग सुनिश्चित करणे हा आहे. डोनाल्ड ट्रम्प या कायद्यावर जोरदार भर देत आहेत. फक्त अमेरिकन नागरिकच अमेरिकन निवडणुकांचे निर्णय घेऊ शकले पाहिजेत. हे सुनिश्चित करण्यासाठी सेव्ह अमेरिका ऍक्ट हे एक सुज्ञ, द्विपक्षीय विधेयक आहे.

ताज्या बातम्या

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावेत – पालकमंत्री गिरीश...

0
नाशिक, दि. १९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून होणारी विविध विकास...