Wednesday, August 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात वाढ; कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार, नवा अधिनियम...

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात वाढ; कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार, नवा अधिनियम जारी

मुंबई | Mumbai
राज्यात महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026 अधिसूचित करण्यात आले आहे. यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा (Mahayuti Cabinet Ministers Decision) निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026’ अधिसूचित करण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत महत्त्वाचे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार आहे.

काय आहे हा अधिनियम?
राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 ही अधिसूचित करण्यात आली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हिताच्यादृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोणत्याही खात्याच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयात थेट हस्तक्षेप करु शकतात. या अधिसूचनेमुळे सार्वजनिक हिताच्याबाबत मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलू शकतात. मात्र, एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय फिरवताना मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) लेखी स्वरुपात आपली नोंद करावी लागेल. कोणत्याही विभागाच्या प्राथमिक कामकाजाची जबाबदारी त्या मंत्र्यांचीच राहील.

- Advertisement -

परंतु, या नियमामुळे मुख्यमंत्री असतील, मंत्री असेल किंवा मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या कार्यपद्धतीबाबत आणि अधिकाराबाबत त्याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एखाद्या विभागातील कागदपत्रं मागवू शकतात. संबंधित मंत्री तसेच विभागाच्या सचिवांना ती कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल, असे या नव्या नियमात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात महायुतीचे म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे, या निर्णयाचे महायुतीमध्ये कसे पडसाद उमटतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे निर्णय बदलल्यास महायुतीमध्ये वाद निर्माण होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या नव्या नियमावलीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

हॉकी वर्ल्डकप २०२६ : भारताचा पाकिस्तानवर 5-3 फरकाने दणदणीत विजय

0
नेदरलॅंड येथील अॅमस्टेलव्हीन येथील वाजेनर मैदानावर खेळल्या गेलेल्या हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 असा दणदणीत विजय मिळवत दुसऱ्या फेरीतील आपले स्थान...