Friday, January 23, 2026
Homeदेश विदेशH-1B Visa: डोनाल्ड ट्रम्पचा H-1B व्हिसा धारकांना मोठा दणका; व्हिसा फीमध्ये केली...

H-1B Visa: डोनाल्ड ट्रम्पचा H-1B व्हिसा धारकांना मोठा दणका; व्हिसा फीमध्ये केली भरमसाठ वाढ

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशातून येणाऱ्या H-1B Visa धारकांना मोठा दणका दिला आहे. त्यांनी शुक्रवारी H-1B Visa धारकांना आता वर्षाला १ लाख डॉलर व्हिसा फी द्यावी लागणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारतीय तरुणांचे अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी जाण्याचे स्वप्न महागणार आहे. कारण, नव्या नियमांतर्गत आता H-1B व्हिसासाठी अर्ज करताना तब्बल १ लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे ८३ लाख रुपये भरावे लागणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ओव्हल ऑफिसमधून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला उत्तम कामगारांची गरज आहे आणि या पावलामुळे ते येतील याची खात्री होईल. कंपन्यांना अमेरिकन कामगारांना कामावर ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, परंतु त्याच वेळी, विशिष्ट क्षेत्रातील अत्यंत कुशल परदेशी कामगारांसाठी मार्ग खुला राहणार आहे.

- Advertisement -

अमेरिकेत प्रवेश मिळविण्यासाठी H-1B व्हिसाची सर्वाधिक मागणी असते. हजारो भारतीय या व्हिसाद्वारे अमेरिकेत प्रवेश करतात. अमेरिकेतील कंपन्याद्वारे मुख्यत्वे हा व्हिसा दिला जातो. अमेरिकेतील आयटी कंपन्यांकडून याचा जास्त वापर होतो. व्हाईट हाऊसच्या दाव्यानुसार, या नव्या बदलांमुळे अमेरिकन कामगारांचे संरक्षण होईल.

YouTube video player

ट्रम्प गोल्ड कार्ड, ट्रम्प प्लॅटिनम कार्ड आणि कॉर्पोरेट गोल्ड कार्डसारखी वैशिष्ट्ये देखील सादर करण्यात आली आहेत. ट्रम्प गोल्ड कार्ड व्यक्तींना युनायटेड स्टेट्समध्ये अमर्यादित निवासस्थान देते. अमर्यादित निवासस्थान नागरिकांना केवळ पासपोर्ट आणि मतदानाचा अधिकार देत नाही तर अमेरिकन नागरिकाचे इतर सर्व फायदे देखील प्रदान करते.

ट्रम्प प्रशासनातील वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी या निर्णयाचे समर्थन करताना अमेरिकन कंपन्यांना उद्देशून म्हटले, तुम्ही जर कुणाला प्रशिक्षित करणारच असाल तर अमेरिकन भूमीतून पदवीधर होणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षित करा. अमेरिकन नागरिकांना प्रशिक्षित करा. बाहेरच्या लोकांना आणून आपल्या देशातील लोकांच्या नोकऱ्या देऊ नका.

दरम्यान, अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक यांनी सांगितलं की या निर्णयाबाबत सर्व मोठ्या टेक कंपन्यांना विश्वासात घेतलं गेलं आहे. अमॅझोन, अ‍ॅपल, गुगल, मेटा यांच्या प्रतिनिधिंनी याबाबत त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मायक्रोसॉफ्टनं याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...