Sunday, May 19, 2024
Homeधुळेदाऊळ मंदाणे शिवारातील गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त

दाऊळ मंदाणे शिवारातील गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त

दोंडाईचा – Dondaicha – श.प्र :

शहरातील टेकभिलाटी परिसरालगत असलेल्या अमरावती नदीपात्रात दाऊळ-मंदाणे शिवारापर्यंत पोलिसांनी छापा टाकत गावठी दारू निर्मितीचे अड्डे उध्वस्त केले.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसापासून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत होती. तर आज पोलिसांनी आपला मोर्चा हातभट्यांकडे वळविला. कारवाईत एकुण 79 हजार 600 रुपये किमतीचा मुद्धेमाल ताब्यात घेण्यात आला.

दारूमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आल्याचे उदाहरण सर्वांनी जवळून पाहिले आहे. म्हणून दारूविरुद्ध कारवाईची मोहीम अशी सुरू राहील.

दुर्गेश तिवारी, पोलीस निरीक्षक, दोंडाईचा

टेकभिलाटी परिसरात अमरावती नदीपात्रालगत काही जण हातभट्टीच्या माध्यमातून गावठी दारू बनवून विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरिक्षक दुर्गेश तिवारी यांना मिळाली होती.

याबाबत कारवाईसाठी त्यांनी पथक तयार केले. त्यानुसार शनिवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास दोंडाईचा पोलिसांच्या पथकाने अड्ड्यावर छापा मारला.

या छाप्यात गावठी दारू बनवण्याचे विविध साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्याची किंमत 79 हजार 600 रुपये आहे. यासह हे अड्डे उध्वस्त करण्यात आले. अड्डा चालवणारे अज्ञात इसम फरार झाले.

या कामगिरीत उपनिरीक्षक देविदास पाटील, उपनिरीक्षक सचिन गायकवाड पोकाँ योगेश पाटील, होमगार्ड अनिल ईशी, मनोज वाडिले, अमिन शाह, गणेश शिरसाठ, सागर पवार, योगेश जगताप, विलास कुवर, गोपाल चित्ते, भटू चौधरी, मनोज जगदाळे, सुखदेव रामोळे, मनोहर चव्हाण, दीपक सदाराव व पाच महिला होमगार्ड यांनी सहभाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या