Wednesday, January 7, 2026
HomeनगरShirdi : देणगीदार साईभक्तांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’

Shirdi : देणगीदार साईभक्तांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’

साईबाबा संस्थानचा निर्णय || मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची माहिती

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीस येत असतात. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. देणगीदार साईभक्तांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास नुकतीच तदर्थ समितीची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली.

- Advertisement -

या निर्णयानुसार साईबाबा संस्थानमार्फत साजरे होणारे प्रमुख चार उत्सव सोडून देणगीदार साईभक्तांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार विविध प्रकारच्या सेवा, सुविधा विशेषतः दर्शन, आरती सुविधा, बहुमान म्हणून शाल व फोटो, साईचरित्र ग्रंथ, उदी, लाडू प्रसाद, भोजन पास इत्यादी दिल्या जाणार आहेत. या धोरणामुळे साईभक्तांना अधिक चांगल्याप्रकारे सुविधा देण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे. 10 हजार रुपये ते 24,999 हजार रुपये पर्यंतचे दान देणार्‍या साईभक्तास एका वेळेस कुटुंबातील 5 सदस्यांसाठी आरती पास दिला जाईल. तसेच 5 उदी प्रसाद पॅकेट्स, 1 लाडू प्रसाद पॅकेट दिले जातील. 25 हजार ते 50 हजार रुपये पर्यंतचे दान देणार्‍या साईभक्तास दान करते वेळी दोन वेळेस कुटुंबातील 5 सदस्यांसाठी आरती दर्शन पास दिला जाईल.

YouTube video player

तसेच, एक थ्रीडी उदी पॉकेट, फोटो, 5 उदी प्रसाद पॅकेट्स, 1 साई सतचरित्र ग्रंथ, 2 लाडू प्रसाद पॅकेट्स दिले जातील. 50 हजार ते 99,999 हजार रुपये पर्यंतचे दान देणार्‍या साईभक्तास दान करतेवेळी कुटुंबातील 5 सदस्यांसाठी दोन व्हिव्हिआयपी आरती पास दिले जातील. त्याचबरोबर एक थ्रीडी पॉकेट फोटो, 5 उदी प्रसाद पॅकेट्स, 1 साई सतचरित्र ग्रंथ, 2 लाडू प्रसाद पॅकेट्स दिले जातील. 1 लाख ते 9,99,999 रुपये पर्यंतचे दान देणार्‍या साईभक्तास त्यांनी दान केलेल्या वर्षामध्ये 2 व्हिव्हिआपी आरती पास मिळतील तसेच नंतरच्या वर्षामध्ये त्यांनी केलेल्या दानाप्रमाणे प्रति वर्ष 1 व्हिव्हिआयपी आरती पास मिळेल. त्यांना गेट नं. 6 किंवा त्यावेळी कार्यरत असलेल्या सशुल्क दर्शन रांगेतून कुटुंबाच्या 5 सदस्यांसाठी तहयात वर्षातून एक वेळेस मोफत दर्शन सुविधा दिली जाईल.

तसेच, साईभक्तास देणगी दिल्यानंतर एक वेळेस बहुमान म्हणून, 1 सन्मान शॉल, 1 थ्रीडी डेस्क नोट होल्डर, थ्रीडी शेप फोटो, 1 थ्रीडी, पॉकेट फोटो, अभिषेक सत्यनारायण पुजेचे कूपन, 5 उदी प्रसाद पॅकेट्स, 1 साई सतचरित्र ग्रंथ, 3 लाडू प्रसाद पॅकेट्स आणि कुटुंबातील 5 सदस्यांसाठी मोफत व्हिआयपी प्रसाद भोजन पास दिले जातील. 10 लाख ते 50 लाख रुपये पर्यंत दान देणार्‍या साईभक्तास त्यांनी देणगी दिलेल्या प्रमाणात प्रत्येक वर्षी 2 व्हिव्हिआयपी आरती पास मिळतील, देणगीदार साईभक्ताचे कुटुंबातील 5 सदस्यांना तहयात वर्षातून एक वेळेस मोफत प्रोटोकॉल दर्शन दिले जाईल. देणगीदार साईभक्तास वर्षात एक वेळेस श्री साईबाबांना वस्त्र परिधान करण्यासाठी वस्त्र देण्याची संधी दिली जाईल.

देणगीदार साईभक्तास दान करतेवळी एक वेळेस श्री साईबाबांना परिधान केलेले वस्त्र भेट म्हणून दिले जाईल. देणगीदार साईभक्तांस दान करतेवेळी बहुमान म्हणून 1 सन्मान शॉल, 1 श्री साईंची मूर्ती, थ्रीडी डेस्क नोट होल्डर, थ्रीडी शेप फोटो, थ्रीडी पॉकेट फोटो, अभिषेक सत्यनारायण पूजेचे कूपन, 5 उदी पॅकेट्स, 1 साई सतचरित्र पुस्तक, 5 लाडू प्रसाद पॅकेट्स, कुटुंबातील 5 सदस्यांसाठी मोफत व्हिआयपी प्रसाद भोजन पास मिळेल. 50 लाख रुपये आणि त्याहून अधिकचे दान देणार्‍या साईभक्तास तहहयात 5 सदस्यांच्या कुटुंबासाठी प्रति वर्ष 3 व्हिव्हिआयपी आरती पास मिळतील. देणगीदार साईभक्तास साईबाबांना परिधान करण्यासाठी वस्त्र देण्याची संधी दिली जाईल.

ही वस्त्र देणगीदार साईभक्त आयुष्यभरात कधीही दान करू शकतात. त्याकरिता 1 महिना अगोदर कळविणे बधंनकारक राहील. देणगीदार साईभक्तांस दान करतेवेळी साईबाबांना परिधान केलेले वस्त्र भेट म्हणून दिले जाईल. देणगीदार साईभक्तासह कुटुंबांतील 5 सदस्यांना प्रत्येक वर्षी 2 प्रोटोकॉल व्हिव्हिआपी दर्शन पास मिळतील, ही सुविधा तहयात लागू राहील. देणगीदार साईभक्तास बहुमान म्हणून 1 सन्मान शॉल, 1 श्री साईंची मूर्ती, थ्रीडी डेस्क नोट होल्डर, थ्रीडी शेप फोटो, थ्रीडी पॉकेट फोटो, अभिषेक, सत्यनारायण पूजेचे कूपन, 5 उदी पॅकेट्स, 1 साई सतचरित्र ग्रंथ, 5 लाडू प्रसाद पॅकेट्स, देणगीदार साईभक्ताच्या कुटुंबातील 5 सदस्यांना मोफत व्हिआयपी प्रसाद भोजन पास दिले जाणार आहेत, अशी माहिती श्री. गाडीलकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...