Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"आम्हाला पहिले बहीण भाऊ म्हणणे बंद करा"; पंकजा मुंडेंच धक्कादायक विधान, नेमक्या...

“आम्हाला पहिले बहीण भाऊ म्हणणे बंद करा”; पंकजा मुंडेंच धक्कादायक विधान, नेमक्या अशा का म्हणाल्या?

बीड | Beed
राज्यात सध्या नगर परिषदा व नगरपंतायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये या निवडणुका पार पडत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाने या निवडणुकीसाठी ताकद लावली. 5.30 पर्यंत मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. पंकजा मुंडे देखील बीड जिल्ह्यामध्ये या निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या. नुकताच पंकजा मुंडे यांनी मोठे भाष्य केले.

पंकजा मुंडे नेमके काय म्हणाल्या?
आम्हाला पहिले बहीण भाऊ म्हणणे बंद करा
बीडमध्ये १३ वर्षांनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र एकाच पॅनेलमधून यंदाची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे बीडमध्ये जनतेचा कौल कोणाला असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, “आम्हाला पहिले बहीण भाऊ म्हणणे बंद करा. आम्ही बहीण भाऊ आहोतच, पण त्याही आधी आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे एक नेतेही आहोत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, आणि भाजपची नेता असून आमची युती झाली आहे. अशी युती अनेक ठिकाणी झाल्या आहेत.” असे म्हणत स्पष्टीकरण दिले.

- Advertisement -

आम्ही बहीण भाऊ जरी असलो तरीही, त्याआधी आम्ही…
“आम्ही बहीण भाऊ जरी असलो तरीही, त्याआधी आम्ही राजकीय जीवनात २०-२२ वर्षे झोकून दिलेले राजकीय नेते आहोत आपापल्या पक्षाचे. जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्रपणे पॅनेल केला आहे,” असे स्पष्टीकरण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिले आहे. तसेच, संपूर्ण जिल्ह्याच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचाच विजय होईल, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

YouTube video player

आमदार धनंजय मुंडे यांचा काही वर्षांपूर्वी खून झाला असता, परंतु त्यांना एका महाराजांनी वाचवलं, असं वक्तव्य गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलं आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, मी असल्या बिभत्स आरोपांवर उत्तर देणार नाही.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...