Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSupriya Sule: भाजपने मला तोंड उघडायला लावू नये…; विधान परिषदेतील घोडेबाजारावर सुप्रिया...

Supriya Sule: भाजपने मला तोंड उघडायला लावू नये…; विधान परिषदेतील घोडेबाजारावर सुप्रिया सुळेंचा संताप

पुणे | Pune
विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घोडेबाजारावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार झाला नाही. मतं नव्हती म्हणून विरोधकांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आम्ही त्याचे स्वागतच करतो, असे सत्ताधाऱ्यांनी म्हटले आहे. तर या निवडणुकीत पैशाचा महापूर होता. आमच्या उमेदवारांना अमिष दाखवले, जे ऐकत नव्हते त्यांना धमक्या दिल्या. त्यामुळेच उमेदवारांनी माघार घेतल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली आहे. मला तोंड उघडायला लावू नका. मी पुरावे देईन, असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करूनच पुण्यात माघाराची निर्णय घेण्यात आला, असे स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं आहे. या प्रतिक्रियेनंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय उत्तर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सुप्रिया सुळे पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होत्या.

- Advertisement -

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करूनच पुण्यात माघारीचा निर्णय घेण्यात आला. त्याचे कारण प्रचंड मोठ्या घोडेबाजाराची चर्चा होती. महाविकास आघाडीच्या ८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. मी स्वत: एक बिल आणत आहे. सगळ्या निवडणुकांत घोडेबाजाराचा आरोप होतो, हा बंद झाला पाहिजे. हात वर करून सरपंच ते लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे झाली पाहिजे. हे बिल मी स्वत: मांडत आहे. भविष्यात तुम्हाला बदल झालेला दिसेल.”

Raj Thackeray: मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका…; राज ठाकरेंनी नेमकं काय आवाहन केलं?

भाजपने मला तोंड उघडायला लावू नये
महाविकास आघाडी नाहीतर माघार पार्टी, असे म्हणावे लागेल, अशी टीका भाजपनं केल्याबद्दल सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी माघार आघाडी झाल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. त्याबाबत तुमचं काय मत आहे? असं सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपला इशाराच दिला. भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृत असल्याने काही बोलत नाही. तो माझा स्वभाव नाही. विधानसभा आणि लोकसभेत आम्ही त्यांच्या विरोधात ताकदीने लढूच. पण आता हा जो घोडेबाजार झाला. कोण काय आणि कसं झालं? हे तुम्हालाही माहीत आहे. मलाही माहीत आहे, असा सूचक इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...