Saturday, June 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray: मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका…; राज ठाकरेंनी नेमकं काय आवाहन...

Raj Thackeray: मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका…; राज ठाकरेंनी नेमकं काय आवाहन केलं?

मुंबई | Mumbai
अखंड हिंदुस्तानाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आणि शिवरायांच्या प्रत्येक भक्ताला स्वाभिमान वाटेल असा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन. 6 जून म्हणाजे आज रायगडावर छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राज्याच्या विविध भागात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही आजच्या दिनानिमित्त एक खास पोस्ट लिहीली आहे. किल्ले रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याचा पहिला साक्षीदार किल्ले रायगड आहे. त्यावेळी किल्ल्यावर वातावरण काय आनंदी, उत्साही असेल, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
‘हा दिवस फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सण म्हणून साजरा व्हायला हवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची आस सामान्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढची अनेक शतकं हा हिंद प्रांत खितपत पडला असता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हायला हवा ‘ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे. मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करत हा दिवस साजरा करावा, असेही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलेय.

- Advertisement -

Sonam Wangchuk: “जर कोणाचीही अटक झाली तर….”; अभिजित दिपकेंच्या आंदोलनावर सोनम वांगचुक सरकारला यांचा इशारा

मरहट्ट्यानी हिंद प्रांतावर राज्य केलं, त्याची बीज रोवली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण हिंद प्रांत परकीयांच्या आक्रमणाने पूर्ण खचला होता. आक्रमकांच्या फौजांपुढे आपला टिकाव लागणारच नाही हे गृहीत धरून जवळपास प्रत्येक जण आक्रमकांना शरण गेला होता. अशावेळेला ‘स्वराज्य’ असावं हे स्वप्न पाहायचं आणि वयाच्या 15 व्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यायची आणि पुढे वर्षभरात तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ करायची, पुढे जवळपास 29 वर्ष झुंज देऊन एक असं राज्य जिथे आपली संस्कृती, आपली भाषा, यांना कुठलाही अटकाव नाही, आपली करपद्धती, आपली राज्यशासन पद्धती असलेलं एक राज्य उभं करायचं आणि त्याची घोषणा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगासमोर करायची. हा दिवस असा दिवस आहे ज्याने पुढे मरहट्ट्यानी हिंद प्रांतावर राज्य केलं, त्याची बीज रोवलीच पण पुढे ब्रिटिशांच्या विरोधात उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देखील राज्याभिषेक दिनातूनच मिळाली, असे राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हायला हवा
शिवराज्याभिषेक दिन सोहळा दिनाची तुलना 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेतील 13 वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा केली त्याच्याशी होऊ शकते किंवा 14 जुलै 1789 रोजी झालेल्या फ्रेंच क्रांतीच्या दिवसाशी होऊ शकते. या दोन्ही घटना घडायच्या आधी जवळपास 100 वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्यातून त्यांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा विचार रुजवला. जसं या दोन घटनांनी अमेरिका आणि युरोप यांचा भूगोल बदलला आणि भविष्यच बदललं तशीच ताकद आपल्या शिवराज्याभिषेक दिवसांत आहे, याची राज ठाकरे यांनी मराठीजनांना आठवण करून दिली आहे. शिवरायांनी स्वराज्याची आस सामान्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढची अनेक शतके हा हिंद प्रांत खितपत पडला असता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News :  ‘डॉन’ बनण्याच्या इर्षेतून थेट गोळीबार; भाईगिरी कॅमेऱ्यात...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik देवळालीगाव (Dolali Gaon) परिसरात बुधवारी मध्यरात्री एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार (Firing) करण्यात आला. प्राण वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर पळत गेलेल्या...