Friday, May 17, 2024
Homeदेश विदेश'गुगल'कडून अपराजित भारतीय पहिलवानाला 'डूडल' सलामी

‘गुगल’कडून अपराजित भारतीय पहिलवानाला ‘डूडल’ सलामी

मुंबई | Mumbai

गुगलने (Google) डूडलवरून (Doodle) आज भारतीय कुस्तीवीर गुलाम मोहम्मद बक्श बट (Ghulam Mohammad Baksh Butt) यांना सलामी दिली आहे. ते ‘द ग्रेट गामा’ (The Great Gama) या नावाने ओळखले जातात. आज त्यांची १४४ वी जयंती असून या निमित्त गूगलच्या होम पेजवर त्यांना समर्पित गूगल डूडल झळकत आहे…

- Advertisement -

वृंदा झवेरी (Vrinda Zaveri) यांनी हे डूडल साकारले असून या डूडल सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार चर्चा सुरु आहे. गुलाम हे १५ वर्षांचे असताना त्यांना कुस्ती शिकण्यास सुरुवात केली होती.

थोड्याच दिवसात त्यांना भारतीय वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमध्ये राष्ट्रीय नायक म्हणून स्थान मिळाले होते. १९४७ साली फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचारातून अनेक हिंदूचे प्राण त्यांनी वाचवले होते. गुलाम यांच्या कारकिर्दीत त्यांचा एकाही कुस्तीच्या सामन्यात पराभव झाला नाही.

Visual Story : आसाममध्ये हाहाकार; अंगाचा थरकाप उडवणारे फोटो आले समोर

गुलाम यांचा १९६० साली मृत्यू झाला. आयुष्यातील शेवटचा काळ त्यांनी लाहोरमध्ये घालवला. प्रिन्स ऑफ वेल्स यांनी गुलाम यांना चांदीची गदा देऊन त्यांचा सन्मान केला होता. ब्रूस ली हेसुद्धा गुलाम यांचे प्रशंसक असून आपल्या प्रशिक्षणासाठी त्यांना आदर्श मानतात. गुलाम यांची कारकीर्द आताच्या पिढीतील कुस्तीपटूंना प्रेरणादायी ठरते.

- Advertisment -

ताज्या बातम्या