Thursday, November 21, 2024
HomeनाशिकNashik News : डॉ. अरुण स्वादी यांचे निधन

Nashik News : डॉ. अरुण स्वादी यांचे निधन

देवळाली कॅम्प | Deoli Camp

येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व रोटरी क्लबचे उपप्रांतपाल व इंडियन मेडिकल असोसिएशनचे नाशिकरोडचे माजी अध्यक्ष व देवळाली रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व दैनिक देशदूतला राउंड द विकेट स्तंभलेखन करणारे लेखक डॉ. अरुण स्वादी (Dr.Arun Swadi) (७०) यांचे सकाळी साडेदहा वाजता संगमनेर येथे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले.

- Advertisement -

काल संगमनेर येथील त्यांच्या मुलीच्या (Girl) घरी ते असताना हृदयाचा त्रास जाणवू लागला. त्याचवेळी त्यांची कन्या डॉ. आकांक्षा सोनांबेकर यांच्या रूग्णालयात दाखल करून घेतले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉ. स्वादी हे देवळालीतल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल येथे १९८८ दरम्यान सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचे बाल रुग्णालय सुरु केले होते. त्याचबरोबर त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून कार्य करत असताना ते रोटरी क्लबचे १९९७ साली अध्यक्ष असताना श्रम परिहार पुरीभाजी केंद्र सुरु करण्यात आले होते. स्वादी हे १९८७ पासून क्रिकेट विश्वचषक सामन्याचे ते उत्तम समीक्षण करत.

डॉ. स्वादी यांचा दैनिक देशदूतचा राउंड द विकेट (Round the Wicket) हा प्रसिद्ध स्तंभलेख वाचकांसाठी प्रिय होता.याशिवाय नाशिकमधील सर्वच प्रमुख दैनिकांमधून ते वेळोवेळी लिखाण करत होते. त्यांनी स्वतःचे क्रिकेटवर आधारित सिक्सर, चित्रपट क्षेत्राशी निगडित सरमिसळ तर एप्रिल महिन्यात पुणे येथे ललितलेखांचे …के दिल अभी भरा नही, अशी ग्रंथसंपदा प्रकाशित केली होती. परिसरात (Area) ते उत्तम सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी डॉ. अलका स्वादी, दोन मुली, जावई, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. नाशिकमधील (Nashik) साहित्य चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने देवळाली कॅम्प परिसरावर शोककळा पसरली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या