Friday, September 20, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकहून आता जगात कुठेही फिरा; विमानसेवेच्या वेळा बदलल्या

नाशिकहून आता जगात कुठेही फिरा; विमानसेवेच्या वेळा बदलल्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक (ओझर) (Nashik Ozar Airport) विमानतळ येथून नाशिक-हैद्राबाद-नाशिक (Nashik Hydrabad Nashik), नाशिक-दिल्ली-नाशिक (Nashik Delhi Nashik), नाशिक- पाँडेचरी (Nashik to Puducherry Flight) व नाशिक-तिरूपती (Nashik Tirupati) विमानसेवा स्पाइस जेट (spice jet) या कंपनीच्या माध्यमातून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे….

या विमान सेवेमुळे नाशिक आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नागरी विमानन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी मंजूरी दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharati Pawar) यांनी दिली आहे.

करोना विषाणूच्या महामारीमुळे लॉकडाऊनपूर्वी थेट नाशिक-दिल्ली (Nashik Delhi Air Service) विमानसेवेला चांगला प्रतिसाद असल्याने स्पाइस जेटमार्फत ही सेवा आठवड्याचे सातही दिवस चालू होती.

करोना कालावधीत ही विमानसेवा खंडीत झाली होती. नाशिक-दिल्ली विमान सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharati Pawar) यांनी केंद्रीय नागरी विमानन मंत्री यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.

त्यानुसार नागरी विमान वाहतूक विभागाने बोईंग ७३७ मॅक्सला परवानगी दिली असून स्पाइस जेटला देखील नाशिक-दिल्ली विमानसेवा दररोज सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

येत्या ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नाशिक-नवी दिल्ली (Nashik Delhi Air Service) विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, आता ही सेवा दुपारऐवजी सायंकाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

त्यामुळे नाशिकच्या प्रवाशांना दिल्ली येथून रात्रीच्या विमानांद्वारे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी (International air connectivity) मिळणार असून यामुळे नाशिककरांचा परदेश प्रवास सुखकर होणार आहे.

या विमानसेवेचा उद्योग क्षेत्राला देखील फायदा होणार आहे. तसेच नाशिक (ओझर) (Nashik Ozar Airport) विमानतळाचा पीपीपी मोडवर (PPP Mode) विकास करावा. नाशिक (ओझर) विमानतळ मुंबईच्या जवळ असल्याने येथे कार्गो, नाईट लँडिंग (Night Landing) आणि नाईट पार्किंगसाठी हब (Night Parking Hub) बनवण्याची मागणी करण्यात आली असून त्‍यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही केंद्रीयमंत्री सिंधिया यांनी सांगितले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या