Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजडॉ. गौरी गर्जेंच्या आत्महत्येनंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माझी लेक…

डॉ. गौरी गर्जेंच्या आत्महत्येनंतर वडिलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माझी लेक…

मुंबई | Mumbai
मुंबईतील वरळी येथे आत्महत्या करणाऱ्या डॉ. गौरी यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. अनंत गर्जे यांचे बाहेर प्रेमसंबंध होते. यावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती आणि याबद्दल गौरीने आपल्या वडिलांना माहिती दिली होती, तसेच चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट ही पाठवले होते. काल गौरीने आत्महत्या केली, त्याआधी दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते आणि भांडणादरम्यान तिने स्वतःला संपवले, असा आरोप गौरीच्या वडिलांनी केला आहे.

गौरी पालवे गर्जे यांच्या कुटुंबियांकडून अनंत गर्जे याच्यावर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर अनंत गर्जे करत असलेली दावे खोटे असल्याचे गौरीच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. अनंत गर्जे फरार असल्याचा दावा, गौरीच्या कुटुंबियांकडून केला जात असतानाच आता गौरी पालवे हिचे वडील अशोक पालवे यांनी लेकीच्या आत्महत्येनंतर मोठे विधान केले. मुलीच्या आत्महत्येबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, आता मी काय बोलू माझी लेक गेली…

- Advertisement -

अनंत गर्जे काय म्हणाले?
शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. गौरी गर्जे यांनी वरळीतील बीडीडी चाळीतील त्यांच्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. महत्त्वाचे म्हणजे, गौरी स्वतःला संपवत असताना अनंत गर्जे घरात उपस्थित होते, अशी माहिती कुटूंबियांनी दिली आहे. तर, घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते. घाबरून ३१ व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून मी ३० व्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतल्या अवस्थेत होती, गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून मी रुग्णालयात नेले, असे अनंत गर्जे यांनी म्हटले आहे.

YouTube video player

अनंतचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा गौरीला संशय
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर येताच खळबळ उडाली. डॉ. गौरी गर्जे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. १० महिन्यांपूर्वीच पीए अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांचा विवाह झाला होता. तर अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याचा संशय असल्याने गौरी गर्जे या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.नवऱ्याचे बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत, यावरुन दोघांमध्ये भांडणं व्हायची, त्या मानसिक तणावात होत्या.

मी तर मरेन…तुलाही गुंतवेन
अनंत गर्जेंच्या पत्नी डॉ. गौरी गर्जेंनी आत्महत्या केल्यानंतर गौरीच्या माहेरच्यांकडून अनंत वर गंभीर आरोप करण्यात आले आहे. गौरीने आत्महत्या करण्यापूर्वी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. अनंत गर्जेने स्वत:च्या हातावर चाकूने सपासप वार केले आणि म्हटले की, मी तर मरेल पण तुलाही गुंतवेल… गौरीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, आमची मुलगी खूप जास्त मेहनती होती. ती एक चांगली डॉक्टर होती आणि स्वत:च्या पायावर उभी होती खूप जास्त मेहनत करून ती इथपर्यंत पोहोचली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ridhima Pathak : ‘देश आधी, लीग नंतर!’ भारतीय प्रेझेंटर रिद्धिमा पाठकची...

0
दिल्ली । Delhi भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण वळणावर आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होताना...