Tuesday, January 6, 2026
Homeराजकीयडॉ. गौरी पालवेंच्या वडिलांचं वरळी पोलिसांना पत्र; केली 'ही' मागणी

डॉ. गौरी पालवेंच्या वडिलांचं वरळी पोलिसांना पत्र; केली ‘ही’ मागणी

मुंबई । Mumbai

भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांना वरळी पोलिसांनी अटक केली आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या निधनानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी, त्यांच्या आई-वडिलांनी मात्र यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी पती अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत ही घटना केवळ आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे.

YouTube video player

गौरी पालवे यांचे वडील अशोक पालवे यांनी याप्रकरणी वरळी पोलिसांना एक पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी फक्त अनंत गर्जेला अटक न करता, गौरीच्या कथित हत्या प्रकरणात दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे यांनाही तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेचे आरोपपत्रात आपण या तिघांचाही उल्लेख केला होता, परंतु इतर दोन आरोपी अजूनही मोकळे फिरत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

अशोक पालवे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात अनंत आणि गौरी राहत असलेल्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. हत्येच्या दिवशीचा संपूर्ण दिवसाचा लिफ्ट, जिना आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. या फुटेजमधून प्रकरणाचे सत्य बाहेर येण्यास मदत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांचा विवाह अवघ्या १० महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात झाला होता. या विवाह सोहळ्याला मंत्री पंकजा मुंडे यांनीही उपस्थिती लावली होती. लग्नाच्या इतक्या कमी कालावधीत गौरी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवारी, २२ नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली असून वरळी पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशोक पालवे यांनी केलेले आरोप, सीसीटीव्ही फुटेजची मागणी आणि इतर दोन आरोपींच्या अटकेची मागणी या अनुषंगाने पोलीस अधिक माहिती जमा करत आहेत. या प्रकरणाच्या तपासातून नेमके काय सत्य बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...